शरद मोहोळ केसला नवीन वळण, मारेकऱ्यांनी केली घोषणाबाजी..

Pune

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार डॉन शरद मोहोळ याच्यावर काही दिवसांपूर्वी (5 जानेवारी) गोळीबार करून हत्या करण्यात आली. त्यातील मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असल्यामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करताना आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याची धक्कादायक बाब पोलिस चौकशीमध्ये उघडकीस आली आहे. तसेच मोहोळ खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण?, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असून आरोपीने मोहोळवर गोळीबार करताना एका गुंडाच्या नावाने घोषणा का दिली, तसेच संबंधित गुंड मोहोळ खून प्रकरणात सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आला आहे.

तसेच कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणात साहील उर्फ मुन्ना पोळेकर, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना लगेच अटक करण्यात आली होती. शुक्रवारी ( 5 जानेवारी) शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर दुपारी एकच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा परिसरातून पत्नीसोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी जाणार होता. त्यावेळी मोहोळच्या टोळीत नुकताच सामील झालेला मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी मोहोळवर पिस्तुलातून 4 गोळ्या झाडल्या. मोहोळचा खून झाल्यानंतर पुणे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडताना पोळेकरने शहरातील एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे उघडकीस आले. या खून प्रकरणात तो गुंड सामील आहे का? त्याने पोळेकरला सुपारी दिली का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात शरद मोहाेळचा खून जमिनीचा वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे.

पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी मोहळचा खून करण्यासाठी कट रचल्याचे उघडकीस आले आहे. मोहोळच्या खुनानंतर शहरात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांसमोर टोळीयुद्ध रोखण्याचे आव्हान मात्र पुन्हा एकदा निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *