शरद मोहोळला मारण्याअशीच झाली होती ‘त्या’ वकिलांसोबत ‘मीटिंग’..

Pune

5 जानेवारी रोजी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची दुपारी गोळ्या झाडून हत्या झाली होती. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असल्याचे दिसून येत आहे. आता या हत्येप्रकरणातील आरोपींना 6 आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी ठरला.

दरम्यान, पुणं शहर अजूनही कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येच्या धक्क्यातून अद्याप सावरलेलं नसतानाच, रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होत असल्याचे दिसत आहे. शुक्रवार, 5 जानेवारी रोजी गुंड शरद मोहळ याची त्याच्याच घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामध्ये 2 वकिलांसह 8 जणांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानुगडे हे यातील मुख्य आरोपी होते. तर या हत्येसाठी पिस्तूल पुरवणाऱ्या धनंजय मटकर आणि सतीश शेंडगे यांनाही पोलिसांनी अटक केली होती. पोलिस या हत्या प्रकरणाचा कसून तपास करत असून आता या प्रकरणी आणखी मोठी माहिती समोर आली असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी शरद मोहळ हत्या प्रकरणात 2 वकिलांनाही अटक करण्यात आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची या वकिलांसोबत आधीच “मीटिंग” झाली असल्याची कबुली दिली आहे. तसेच या हत्येचा हा कट बऱ्याच काळापासून शिजत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, 5 जानेवारीला त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच शरदची हत्या झाली.

मात्र, तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. कारण यापूर्वीही आरोपींनी 2 ते 3 वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले जाते. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला होता. दरम्यान, या प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येते असून त्यानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहळ याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात आरोपींना यश मिळालं नाही.

त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची 2 आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. यामध्ये ॲडव्होकेट संजय उढाण याचे एका हत्याकांडातील एका आरोपीबरोबर खून करण्यापूर्वी संभाषण झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असल्याचे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर त्या दोन्ही वकिलांना शरद मोहोळच्या खुनाच्या प्लानची संपूर्ण माहिती होती, असेही पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे.

तसेच शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून ॲड. रवींद्र पवार आणि ॲड. संजय उढाण यांना हल्ला झालेल्या दिवशीच अटक करण्यात आले होते. तसेच शरद मोहोळ याचा खून करण्याचे मुन्ना याने निश्चित केले. शरद याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यामुळे नेहमीप्रमाणे शरद मोहोळ याच्या घरी त्याच्या माणसांची वर्दळ होती. जवळच्या लोकांचे जेवण झालं, त्यात मुन्नाही सामील होता.

दरम्यान, 5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता मुन्ना आणि शरद मोहोळ याच्या घरी जेवण करायला बसला. जेवण झाल्यानंतर शरद मोहोळ आणि मुन्ना देवदर्शनासाठी एकत्रच बाहेर पडले. त्यावेळी शरद मोहोळ याचे नेहमीचे साथीदार त्याच्यासोबच नव्हते. मुन्ना याने हा मोका साधत त्याच्या साथीदारांसह शरदवर हल्ला चढवला आणि त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडून ठार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *