शहरांतील IPL सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावण्याऱ्या क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश !!

Pune

पोलिसांनी सांगितले की, आरोपी वेगवेगळ्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेट चालवून लोकांची फसवणूक करत होते.
पुणे शहर पोलिसांनी बुधवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2024 क्रिकेट सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी दोघांना अटक असल्याचं सांगितलं जातं आहे.

दरम्यान, वसीम बागवान वय 36, रा. हडपसर, हांडेवाडी रोड आणि तेजस रुपारेल 42, रा. सॅलिसबरी पार्क अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  आरोपी सॅलिसबरी पार्कमधील एका अपार्टमेंटमधून वेगवेगळ्या वेबसाइट आणि मोबाईल फोनद्वारे ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीचे रॅकेट चालवून लोकांची फसवणूक करत होते.

पोलिसांनी दोघांना भादंविच्या कलम 420, 34 आणि जुगार प्रतिबंधक कायदा आणि आयटी कायद्याच्या कलमांखाली अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 5 मोबाईल जप्त केले आहेत. तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *