sfraewG

एमएस धोनी आणि सुरेश रैना दिसणार पुन्हा एकत्र? T10 मधील या संघाच्या जर्सीत खेळणार…

क्रीडा

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाची दोस्ती ही आजही प्रसिध्द आहे. तसेच सुरेश रैनाच्या अनेक वक्तव्यवरून त्याची आणि धोनीची मैत्री किती पक्की आहे, हे समजू शकते. तसेच याची कल्पना मिळू शकते. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा सुरेश रैनाला विचारले होते की तो CSK व्यतिरिक्त कोणत्या संघातून सामना खेळणार आहे किंवा त्याला कोणत्या संघासोबत सामने खेळण्यात रस आहे.

तेव्हा सुरेश रैना म्हणाला होता की, “माही भाई खेळला नाही तर मीही खेळणार नाही. जर आम्ही 2021 चे जेतेपद पटकावण्यात यशस्वी झालो तर मी त्याला 2022 च्या किताबासाठी मनवेन.”

तसेच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटपटू सुरेश रैना पुन्हा एकदा एकत्र खेळताना दिसणार आहेत. धोनीचा हा आयपीएलमधील शेवटचा सीझन असेल, असे मानले जात आहे. यानंतर तो T10 लीग खेळू शकतो.. कारण मिस्टर IPL सुरेश रैना अबू धाबी t10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सकडून खेळत आहे. तसेच रैना आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता, त्यानंतर दोघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकत्र खेळताना दिसले होते.

रैनाने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आणि आता तो T10 लीगमध्ये भाग घेत आहे. दरम्यान, धोनी पुढील वर्षी T10 लीगमध्येही प्रवेश करू शकतो आणि असे झाल्यास दोघे पुन्हा एकत्र खेळताना दिसू शकतात. तसेच रैना आणि धोनीही दीर्घकाळ आयपीएलमध्ये एकत्र खेळले आहेत. तसेच दोघेही चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी संघाशी संबंधित आहेत.

धोनी आयपीएल 2023 नंतर या टी-20 लीगमधून निवृत्त होईल आणि असे झाल्यास त्याच्यासाठी टी10 लीग खेळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे मानले जात आहे. 41 वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ICC T20 विश्वचषक, ICC विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याचबरोबर, T10 लीगचे अध्यक्ष शाजी मुल्क यांनी ANI वर सांगितले की, ‘T10 लीगवर धोनीचा मोठा प्रभाव आहे. त्याने आम्हाला या लीगला पुढे जाण्यास सांगितले. तो आयपीएलमधून निवृत्त झाल्यावर आम्ही त्याच्याशी नक्कीच संपर्क करू.

तसेच मुल्क म्हणाले की, अनेक भारतीय क्रिकेटपटू आयोजन समितीच्या संपर्कात असून आगामी काळात आणखी भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळताना दिसतील. पुढील वर्षी सीएसकेकडून खेळणारा रॉबिन उथप्पाही या लीगमध्ये खेळताना दिसणार असल्याचे मुल्कने सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ केवळ निवृत्त क्रिकेटपटूंनाच परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देते.

आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू कोणत्याही परदेशी लीगचा भाग होऊ शकत नाहीत. तसेच महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. मात्र त्यांच्या रिटायरमेंटच्या स्टोरीवरून त्यांच्या मैत्रीचा अंदाज लावला जाऊ शकतो. 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

त्यानंतर काही कालावधीतच सुरेश रैनानेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा निरोप घेतला. धोनी नसेल तर तोही मैदानात दिसणार नाही असे रैनाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *