नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” सटवाई बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते. महाराष्ट्रमध्ये सटवाई ही बाळाचं भविष्य लिहिते अस बुजुर्ग लोक म्हणतात.बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असंही म्हटलं जातं.
या बद्दल संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा या मागे काय आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. सटवाई ची पूजा बाथरूम मध्ये केली जाते. या पूजेनंतर एक कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवला जाते याबद्दलची माहिती आहे. सटवाई ची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक शिशू जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात.
बालकाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो. अस म्हणतात सटवाई कुठल्यातरी रुपात येऊन बाळाच्या कपाळावरती त्याच भविष्य लिहिती. त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात. त्याचवेळेस बाळाच्या लल्लाटीची रेखा आखली जाते.
जेव्हा बाळ मधूनच जागेपणी किंवा झोपेत हसते तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली आणि तीच बाळाला हसवते आहे. झोपेमध्ये पण बाळ हसलं तरी म्हणतात की सटवाई बाळाला हसावत आहे. सटवाई बद्दल ची एक पौराणीक कथा आहे. रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाई च्या मुलीला पडला होता.
तेव्हा तिने आईला याबाबत विचारले. सटवाई ने उत्तर देणे टाळले. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला. ती म्हणाली मी जन्मलेल्या मुलाचे भविष्य लिहिण्यासाठी जाते. असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाई ला म्हणते मग माझे काय भविष्य आहे ते मला सांगा, सटवाई यावर म्हणते तुझं लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशी च होईल.
हे सर्व ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते. काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीवर पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून फेकलेले पाणी तिच्या पिण्यात येते. आणि त्यामुळे तिला दिवस जातात. कालांतराने तिला मुलं झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते.
ते मुलं एका राहाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे गोपन,पोषण, पालपोषण करतो.मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एका जंगलात जातो. तेथे त्याला त्याची माहिती नसलेली आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजेच सटवाई चे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती युवकाच्या प्रेमस प्रतिसाद देत होती.
दोघांचे लग्न ठरते परंतु मुलं टाकताना तेच्या भोवती गुंडळलेले कपडे कापड युवकाने जपून ठेवलेले असते.हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तीच्या लक्षात आले. थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य केव्हाही खोटे ठरत नाही. असा या कथेचा आशय आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.