ज्या लोकांना सर्दी, कफ, खोकला यासारखे आजार वारंवार होतात त्या लोकांसाठी ही माहिती आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये खोकला आणि साठलेला कफ कशाप्रकारे दूर करायचा याचा घरगुती उपाय. या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे, यासाठी तुम्हाला कोणतीही बाहेरून वस्तू खरेदी करावी लागणार नाही.
आपल्या घरामध्ये ज्या वस्तू उपलब्ध असतात अगदी त्याच वस्तूंचा वापर करून आपली सर्दी आपला खोकला आणि कफ बरा होणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक याचा वापर करू शकतात. लहान मुलांनी मात्र याचा वापर करताना वैद्यकीय सल्ला नक्की घ्या.
त्यासाठीची पहिली वस्तू आहे कांदा, तर आपल्याला एक कांदा लागणार आहे. फक्त एक चमचाभर रस आपल्याला या कांद्याचा काढायचा आहे. आता कांदा पांढरा असेल किंवा लाल काळजी करू नका. कोणताही कांदा तुम्ही घेऊ शकता. या कांद्याचा रस काढायचा आहे, हे मिक्सरमध्ये काढू शकता किंवा इतर मार्गाने सुद्धा तुम्ही या कांद्याचा रस काडू शकता.
हा रस काढताना कदाचित तुमच्या डोळ्यांची आग होऊ शकते. ही आग होऊ नये यासाठी महिलावर्गासाठी एक विशेष टीप: आपण सतत बोलत राहा. जर तुमचं तोंड सतत चालू असेल तर तुम्हाला कांद्यामुले डोळ्यांना आग होते ही आग कमी होणार आहे.
तुम्ही करून पहा तुम्हाला दिसेल की खरोखर असे केल्याने डोळ्यांची आग होत नाहीत. आपल्याला कांद्याचा एक चमचाभर रस काढायचा आहे. तुम्ही कोणतीही पद्धत वापरावी मिक्सर मध्ये बारीक करू शकता किंवा खिसणीने खिसून रस काडू शकता. एक चमचाभर रस आपल्याला लागतोय.
हा उपाय आपण दिवसातून दोन वेळा करायचा आहे. एक सकाळी आणि दुसरा म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी ज्यांना ऍलर्जिक सर्दी आहे, त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. मात्र सलग करायला हवा. तुम्ही तीन ते चार आठवडे सलग हा उपाय केला, तर तुमची एलर्जी, सर्दी सुद्धा बरी होते.
बऱ्याच लोकांना धुळीची ऍलर्जी असते. नाकातून सतत पाणी वाहते. अशा लोकांनी सुद्धा हा उपयोग करायला काही हरकत नाही. तर यासाठी आपल्याला एक चमचाभर रस लागणार आहे. दुसरी वस्तू आहे, ते सुद्धा आपल्या किचनमधली आहे ती म्हणजे मध, मध कोणत्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता.
एक चमचाभर मध आपण घेणार आहोत. तुमच्या घरा मध्ये एकापेक्षा जास्त लोकांना सर्दी झाली असेल, कफ झाला असेल, खोकला येत असेल तर अशा लोकांनी लक्षात घ्या. जर तुम्ही दोन चमचे कांद्याचा रस घेत असाल तर दोन चमचे मध सुद्धा टाकायचा आहे.
तीन चमचे कांद्याचा रस घेत असेल तर तीन चमचे मध घ्यायचे आहे. त्यानंतर हे दोन पदार्थ चांगले मिक्स करायचे आहे. हे मिश्रण एकजीव व्हायला हवे आणि त्यानंतर हे मिश्रण आपण दीर्घकाळासाठी साठवण्यासाठी करायचं नाहिये. तात्काळ वापर करायचा आहे, हे जितक्या लवकर तुम्ही वापर कराल तेवढे चांगले आहे.
हे मिश्रण तुम्ही चाटुन खाऊ शकता हे चाटुन खाल्याने तुमची सर्दी, कफ आणि खोकला हे आजार बरे होतात आणि हा घरगुती उपाय आहे. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगितले साठवून ठेवू नका म्हणजे काहीजण फ्रिज मध्ये ठेवतात आणि मग वापरतात किंवा तसंच हे मिश्रण ठेवतात.
कांदा नाशवंत पदार्थ आहे. त्यामुळे कांदा सुद्धा जास्त काळ टिकणारा नाही, त्यामुळे त्याचा वापर आपण लागलीच करायचा आहे. तर अशा प्रकारचा आयुर्वेदिक घरगुती उपाय नक्की करून पहा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.