राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्याची चांगलीच शाळा घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं बोलणाऱ्या कार्यकर्त्यांचे अजित पवारांनी कान टोचले. जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करू नका. आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असंही एका कार्यक्रमात बोलतांना म्हणाले.
आज पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. तसेच आपल्याला विकासावर लक्ष द्यायचं आहे. तसेच “लाथ मारेल, तिथं पाणी काढण्याची धमक” ज्यांच्यात असते तो खरा युवक असतो. तसेच आजच्या युगात जग वेगाने बदलत आहे, प्रगती करत आहे.
त्यामुळे आपल्याला हा आमूलाग्र बदल स्वीकारायला लागणार आहे, असा अमूल्य सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी तरुणांना दिला. तसेच त्यासोबतच अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न आहे असं म्हणाऱ्यांचे अजित पवारांनी कान टोचले. ते म्हणाले की, जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री करून काहीच होत नाही.
आधी संघटन बांधू, ते मजबूत करू, असंही ते यावेळी तरुणांना मार्गदर्शन करताना म्हणाले. तसेच त्याचबरोबर त्यांनी तरुणांना अनेक सल्लेदेखील दिले. तसेच युवा कार्यकर्ता कसा असला पाहिजे?, त्यांनी सध्याच्या काळात नेमकं काय केलं पाहिजे? याविषयावर उपमुख्यमंत्रीनी युवा कार्यकर्त्यांना आज मार्गदर्शन केलं. तसेच युवकांसाठी वय महत्वाचे असते.
‘लाथ मारेल, तिथं पाणी काढण्याची धमक’, ज्यांच्यात असलीच पाहिजे असेही ते म्हणाले. सध्याच्या काळात सोशल मीडियाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं असून त्यामुळं आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे. तसेच विनाकारण आपल्याला कोणी टार्गेट करत असेल, तर त्याचं खंडन तातडीनं करणं आवश्यक आहे. कोना वरिष्ठांच्या निरोपाची वाट पाहू नका.
फक्त उत्तर देताना कोणाच्या भावना दुखावणार नाही, त्यातून वाद निर्माण होणार नाहीयाची काळजी मात्र नक्की घ्या. तसेच चुकीचे आरोप करणाऱ्यांना उत्तरं द्या, असं अनेक सल्लेदेखील त्यांनी तरुणांना दिले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आता फक्त मी अथवा आम्ही सगळ्यांनीच फक्त काम करून चालणार नाही. तर तुम्हा सर्वांना शेवटच्या टोकापर्यंत काम करावं लागणार आहे.
तसेच आज आपल्याला 50 ते 52 आमदार पाठिंबा देत आहेत, तसेच त्यांच्या मनात ही खदखद होती. ते बोलून ही दाखवत होते, मात्र वरिष्ठ त्यांना दाद देत नव्हते. म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला. कोणाचा अपमान, अवमान करण्याचा कोणताही हेतू त्यामागे कधीच नव्हता असेही ते यावेळी म्हणाले..