“साहेब आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका”, शहराध्यक्षचे शरद पवारकडे साकडे..

Pune

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हे नाव आणि ‘पक्ष चिन्ह’ अजित पवार गटाला देण्यात आले असून चिन्ह दिल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचा नामफलक फोडला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ हे नाव आणि ‘पक्ष चिन्ह’ अजित पवार गटाला देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने घेतला होता.

त्यामुळे या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा जाहीर विरोध म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी पुण्यातील पक्ष कार्यालयातील अजित पवार यांचा नामफलक तोडला होता. याचबरोबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. मग त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले होते.

मात्र, या सर्व प्रकरणांनंतर संबंधित कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत वैयक्तिक लक्ष घालावे, शरद पवार यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी समक्ष भेट घेवून साकडे घातले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन शरद पवारांकडे तक्रार केली असल्याचे दिसून आले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र या विषयांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. मात्र त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार या गटाला देण्याचा निर्णय मागील आठवड्यात घेतला होता.

मग त्यानंतर पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर काळया फिती बांधुन या निर्णयाचा जाहीर निषेध देखील व्यक्त करण्यात आला होता. याचबरोबर, “गली गली मे शोर है अजित पवार चोर है, जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा”, अशा प्रकारच्या घोषणा देखील देण्यात आल्या होत्या.

तर पक्ष कार्यालयाबाहेर असलेल्या कोनशिलेवरील अजित पवार यांचे नाव हातोडी मारून फोडण्याचा प्रकार देखील घडला होता. दरम्यान, या घटनेनंतर अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी प्रशांत जगताप यांना जाब विचारला, त्यामुळे काही काळ पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे पक्ष कार्यालय परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त देखील करण्यात आला होता. तसेच या सर्व घडामोडीनंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरूच असतांना आज शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी शिवाजीनगर येथील निवासस्थानी घेऊन गेले होते.

त्यावेळी त्यांनी एकूणच सर्व घटनाक्रम सांगितला. तसेच त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन झाल्यानंतर एक व्यक्ती मला घरी भेटण्यास आला. ज्यांनी अजितदादांच्या नावाची पाटी फोडली तसंच विरोधात घोषणाबाजी केली, त्या आंदोलनकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो. याबाबत मला त्या व्यक्तीने माहिती दिली.

पण या सर्व मुलांनी केलेल्या कृत्याबद्दल माफी देखील मागितली असून दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सांगितले जाते. ही सर्व मुले 25 ते 28 वयोगटातील असून या सर्वांच्या जिवाला काही होऊ नये. त्यामुळे या प्रकरणी स्वतः दादांनी लक्ष घालावं आणि दादांनी मोठेपणा दाखवावा, असं गार्‍हाणं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या समोर मांडलं. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *