सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर बॉलीवुड मधल्या घराणेशाही बद्दल खूप मोठं वादळ निर्माण झालेलं आहे. सामान्य घरातून आलेल्या अनेक तरुण आणि मेहनती कलाकारांना बॉलिवूडमधील काही घराणे कधीच पुढे येऊ देत नाहीत असा सुर सोशल मीडियाच्या माध्यमातून आळवण्यात आलेला आहे.
या सर्व वादात सलमान खान, आलिया भट, करण जोहर अशा काही कलाकार आणि दिग्दर्शक बद्दल जनमानसात त्यामुळे रोष उत्पन्न झालेला आहे आणि यामुळेच घाबरून करणने एक टोकाचं पाहून उचललेलं आहे. जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण.
बॉलिवूडमधील घराणेशाही आणि त्यामुळे सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या कलाकारांना होणारा त्रास हा विषय तसा जुना आहे परंतु सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर मात्र हा विषय परत चर्चेत आला या विषयामुळे आज बॉलिवुडमध्ये वादळ निर्माण झालेलं आहे. बॉलीवूडमधील काही घरानी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कलाकारांना सापत्न वागणूक देतात त्यांना पुढे येण्याची संधी देत नाहीत असे आरोप याआधी देखील अनेक वेळा झालेले आहेत.
पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर करण जोहरला याच विषयावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. याला वैतागून करण जोहर सोशल मीडियावर अजिबात ॲक्टिव्ह दिसत नाही, त्याने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जणांना ब्लॉक देखील केलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊन देखील कोणीही त्याला पाठींबा देत नसल्यामुळे त्याने मुंबई फिल्म फेस्टिवल बोर्ड वरून राजीनामा दिलेला आहे.
करण जोहर ने मुंबई फिल्म फेस्टिवल या बोर्ड वरून स्मृती इराणी यांना राजीनामा दिलेला आहे. त्याला ट्रोल केल्यामुळे तो नाराज असल्याचे यावरून लक्षात येते. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण या फेस्टिवल ची अध्यक्ष आहे तिने करण ला याबाबतीत पुनर्विचार करण्याचा सल्ला देखील दिला आहे या फिल्म फेस्टिव्हलच्या बोर्डवर करण सोबत झोया अख्तर,कबीर खान, सिद्धार्थ रॉय कपूर, विक्रमादित्या मोट्वाने आणि रोहन सिप्पी हे कलाकार देखील आहेत.