भारतीय युवा क्रिकेटर आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला डेट करण्याच्या चर्चा जेव्हा सोशल मीडियावर होऊ लागल्या. तेव्हा अभिनेत्री उर्वशी रौतेलाला बरंच ट्रोल केलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने या चर्चांवर अखेर मौन सोडलं आहे. “माझ्या वक्तव्याचा लोक असा चुकीचा अर्थ काढतील याचा मला काहीच अंदाज नव्हता.
आरपी हा माझा सहअभिनेता आहे आणि त्याचं नाव राम पोथिनेनी आहे. तसेच ऋषभ पंतसुद्धा आरपी म्हणून ओळखला जातो हे मला माहीतच नव्हतं”, असं उर्वशी म्हणाली. काही दिवसांपूर्वीच उर्वशीने अभिनेता राम पोथिनेनीसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. चला तर पाहूया संपूर्ण प्रकरण…
दरम्यान, काही दिवसांपासून बॉलिवुडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत विषयी मोठी प्रतिक्रिया दिली असल्याचे दिसून आले. दरम्यान क्रिकेटपटू रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी यांच्यातील अफेअरच्या चर्चा मागच्या काही महिन्यात चांगल्याच रंगल्या आहेत. त्याच्या काही झलक मागे झालेल्या T20 वर्ल्ड कप मध्येही दिसून आल्या होत्या.
तसेच अशातच उर्वशीने अजून एक प्रतक्रिया देत चाहत्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला असून उर्वशीने स्पष्टीकरण देताना पंतसोबत तिचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर मीडियाशी बोलतांना सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचे नाव मागच्या काही महिन्यांमध्ये पंतसोबत अनेकदा जोडले गेले आहे. या सर्व प्रकरणाची सुरुवात उर्वशीच्या एका मुलाखतीनंतर झाली होती.
यावेळी तिने ‘आरपी’ नावाच्या एका व्यक्तिची उल्लेख केला होता आणि चाहते मात्र आरपीला रिषभ पंत समजून बसले. यावेळी उर्वशीने स्वतः पंत आणि तिच्यातील संबंधाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, उर्वशीने सांगितले नक्की कोण आहे ‘आरपी’ उर्वशी माध्यमांशी बोलताना म्हणाली की, “आरपी माझा सहकारी अभिनेता आहे. त्याचे नाव राम पोथिनेनी आहे. मला तर हे माहिती देखील नव्हते की, रिषभ पंतला देखील आरपी म्हणतात. लोकांनी त्यांच्या मानाने अंदाज बांधले आणि याविषयी लिहू लागले. त्यांनी कमीत-कमी याविषयी स्पष्टीकरण देखील दिले पाहिजे.
जर कोणी यूट्यूब किंवा इतर कोणत्या माध्यमावर काही बोलत असेल, तर लोक इतक्या सहजासहजी त्यावर विश्वास कसा ठेवू शकतात?” तसेच यापूर्वी उर्वशीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यात तिने ‘आरपी’ नाव घेत हा व्यक्ती तिच्या मागे लागला असल्याचे सांगिलते होते. मुलाखतीत उर्वशीने असेही सांगितले होते की, “आरपी मला भेटण्यासाठी उत्सुक होता.”
मात्र, तिने या मुलाखतीत ‘आरपी’ म्हणजे नेमका कोण व्यक्ती आहे, याचा खुलासा केला नव्हता. यानंतर चाहत्यांकडून वेगेवगळ्या प्रतिक्रिया आल्या होत्या. उर्वशी आणि पंत दोघेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते.