आपल्याकडे मसाला म्हणजे दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. कुठल्याही चमचमीत पदार्थासाठी सर्वात पहिली गरज म्हणजे चांगल्या दर्जाचा मसाला होय, भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला मसाला नक्कीच सापडेल.
काही ठिकाणी हा मसाला घरी देखील तयार करतात परंतु जास्त करून हा मसाला बाहेरुनच आणायची पद्धत भारतात रुजलेली आहे आणि याच पद्धतीमुळे मसाल्याचे व्यापारी देखील नेहमीच व्यस्त असल्याचे तुम्हाला आढळून येईल यामुळेच आम्ही तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत घरगुती मसाल्यांचा उद्योग कसा करावा याची माहिती.
मसाल्याच्या व्यापारात तुम्हाला अनेक प्रकारच्या कच्च्या वस्तूंची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. ज्याच्या मदतीने तुम्ही अत्यंत चांगल्या दर्जाचा मसाला तयार करू शकाल. या कच्च्या पदार्थांमध्ये हळद, काळी मिरची, लाल मिरची, जीरा, धने, इत्यादी अनेक प्रकारच्या मसाल्यांचा समावेश असतो. घरगुती मसाला तयार करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो. तुम्हाला मसाला उद्योगात सुरुवात करण्यासाठी मुबलक प्रमाणात मसाले लागतात आणि हे मसाले बऱ्यापैकी स्वस्त देखील असतात या लागणाऱ्या कच्च्या मसाल्यांचा बाजार भाव ( अंदाजे ) तुम्हाला आम्ही सांगत आहोत.
हळद :- 145 रुपये प्रति किलोग्राम, काळी मिरची :- 500 रुपये प्रति किलो ग्राम, लाल मिरची :- 130 रुपये प्रति किलोग्राम, जीरा :- 200 रुपये प्रती किलोग्राम, धने :- 150 रुपये प्रति किलोग्राम, हे सर्व कच्चे मसाले मिळवल्यानंतर तुम्हाला या कच्चा पदार्थांपासून मसाला तयार करण्यासाठी काही लहानशी मशीन्स देखील लागू शकतात तुम्हाला या उद्योगात कुठली मशीन लागेल आणि त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल ते देखील आम्ही सांगत आहोत.
या उद्योगासाठी काही विशिष्ट प्रकारच्या मशीनची नेहमीच आवश्यकता लागते. या मशिनच्या साह्याने तुम्ही तुमच्या मसाल्याची कॉलिटी मेन्टेन करू शकाल. क्लीनर :- या क्लीनर च्या सहाय्याने तुम्ही तुमच्या पदार्थातील दगड-माती काढू शकता. ड्रायर :- या ड्रायर च्या मदतीने तुम्ही तयार केलेला मसाला सहजपणे वाळवु शकाल.
ग्राइंडिंग :- या मशिनच्या मदतीने तुम्ही कमी मेहनतीत जास्तीत जास्त मसाला तयार करू शकाल. बॅग सिलिंग मशीन :- या मशीनच्या मदतीने तुम्ही तयार केलेला मसाला वेगवेगळ्या बॅगमध्ये भरून पॅक करू शकता. या पूर्ण मशीन सेट साठी तुम्हाला जवळपास चार लाख रुपये लागू शकतात, नवीन उद्योग तयार करण्यासाठी चार लाख हे अत्यंत कमी भांडवल आहे.
घरच्या घरी मसाले तयार करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायची गरज पडत नाही तुम्हाला सर्वात जास्त खर्च हा मशीन साठीच करावा लागेल आणि तोही सुरुवातीला. त्यानंतर मात्र उद्योगात जम बसल्यानंतर तुम्हाला प्रगती करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मशीन सोडल्या तर इतर गोष्टींसाठी तुम्हाला सुरुवातीला 20 ते 30 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
तुमचा मसाला तयार झाल्यानंतर तो विकण्यासाठी तुम्ही चांगली जागा निवडणे गरजेचे आहे. या सोबतच तुम्हाला मसाला तयार करण्यासाठी आणि पॅकेजिंग करण्यासाठी देखील जागा आवश्यक आहे. एकदा का मसाला तयार झाला की आवश्यक त्या परवानग्या घेऊन मग तुम्ही हा मसाला बाजार मध्ये नेऊन विकू शकता.पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सरकारी कार्यालयातून परवानगी मिळणे अत्यंत गरजेचे आहे कारण शेवटी हा एक अन्नपदार्थाचा व्यवसाय आहे. आम्ही सांगितलेला पद्धतीचा अवलंब करून तुम्ही भरपूर काळासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या मसाल्याचा व्यापार करू शकता.