भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कारण कॅप्टन रोहित शर्माने रागाच्या भरात आपल्याच सहकाऱ्याला ऐन मैदानावर शिवीगाळ केल्याची बाब समोर आली असून ही घटना बांगलादेशविरुद्ध रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडली. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चला तर पाहूया काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण…
दरम्यान, मीरपूर येथे रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाला हा सामना सहज जिकंता आला असता. परंतु मेहदी हसन मिराजने टीम इंडियाची विजयश्री खेचून नेली. सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावर रागाच्या भरात आपल्याच संघातील क्रिकेटपटूला शिवीगाळ केली.
आता रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर रोहित शर्माला ट्रोल देखील केलं जात आहे. दरम्यान, पहिल्या one day सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माचाही संयम सुटला आणि त्याने सहकारी खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला खराब क्षेत्ररक्षणासाठी शिवीगाळ केली. रोहित शर्माचे हे कृत्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
रविवारी रात्री बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा 1 विकेटने पराभव झाला. तसेच सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्माचाही संयम सुटला आणि त्याने सहकारी खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला खराब क्षेत्ररक्षणासाठी शिवीगाळ केली. याचबरोबर, रोहित शर्माचे हे कृत्यही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. टीम इंडियाच्या खराब फलंदाजीमुळे भारताला केवळ 186 धावांपर्यंतच मजल मारता आली.
या काळात केएल राहुलने सर्वाधिक 73 धावांची खेळी खेळली. या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या भारतीय तसेच संघाला गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. एक वेळ अशी होती की बांगलादेशने 136 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर टीम इंडियाने दोन झेल सोडले आणि सामना तिथून फिरला. तसेच बांगलादेशच्या विजयाचा नायक मेहदी हसन ठरला, त्याने 38 धावांची नाबाद खेळी केली.
याशिवाय, बांग्लादेश गोलंदाज मुस्तफिझूर रहमानसोबत 10व्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. रोहित शर्माला शिवीगाळ करण्याची घटना बांगलादेशच्या डावाच्या 43 व्या षटकातील आहे. वैयक्तिक 15 धावांवर फलंदाजी करत असताना केएल राहुलने तिसऱ्या चेंडूवर मेहदी हसनचा झेल सोडला. यामुळे बांगलादेशी फलंदाजाने पुढच्या चेंडूवर त्याला बाद करण्याची आणखी एक संधी भारताला दिली, मात्र यावेळी वॉशिंग्टन सुंदरने प्रयत्नही केला नाही.
खरे तर शार्दुल ठाकूरचा चौथा चेंडू मेहदी हसनच्या बॅटची कड घेऊन थर्डमॅनवर तैनात असलेल्या वॉशिंग्टन सुंदरकडे गेला, पण सुंदरने चेंडू पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. सुंदरला हवेत चेंडू दिसला नाही की कॅच न पकडण्यामागे आणखी काही कारणे होती हे आता स्पष्ट झालेले नाही. सुंदर झेलपर्यंत पोहोचला नाही, तेव्हा कर्णधार रोहित शर्माच्या तोंडून शिवी निघाली.
मात्र, दुसरीकडे मेहदी हसनने या दोन जीवदानांचा पुरेपूर फायदा घेत भारताच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. मेहदी हसनला त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 7 डिसेंबर रोजी ढाका येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, बांगलादेशने वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 1 गडी राखून पराभव केला.
संघासाठी मेहदी हसनने शानदार फलंदाजी करताना रोमहर्षक विजय मिळवून दिला. मात्र, टीम इंडियाची फलंदाजी तितकी प्रभावी ठरली नाही. टीम इंडिया 186 धावांवर ऑलआऊट झाली. तर बांगलादेश संघाने एक गडी राखून सामना खिशात घातला..