recod

अवघ्या 15 चेंडूत जिंकला टी-20 सामना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या संघाने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रीडा

आपल्या सर्वांना माहीत आहे की, क्रिकेटच्या मैदानात दररोज नवनवे विक्रम रचले जातात. तर जुने रेकॉर्ड मोडले जातात. दरम्यान, रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड घडला आहे. केनियाने एका टी-20 सामन्यात मालीच्या संघाला 105 चेंडू आणि 10 विकेट राखून पराभूत केले. केनियाने हा सामना अवघा 15 चेंडूत जिंकला.

रविवारी सर्वांचे लक्ष भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याकडे होते. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि टीम साऊदीने विक्रमी कामगिरी करून नवे विक्रम रचले मात्र दुसरीकडे केनिया आणि माली यांच्यातील सामन्यातही नवा रेकॉर्ड रचला गेला.

दरम्यान, आयसीसी टी-20 वर्ल्डकप आफ्रिका क्वालिफायर A सामन्यामध्ये हा विक्रम रचला गेला. केनियाने मालीला 105 चेंडू राखून पराभूत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चेंडूंचा विचार केल्यास हा सर्वात मोठा विजय आहे. दरम्यान, एकीकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा सूर्यकुमार यादवच्या विध्वंसक फलंदाजीवर खिळल्या असतानाच, दुसरीकडे एक संघ क्रिकेटमध्ये शानदार विक्रम रचत आहे.

त्या संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामना अवघ्या 15 चेंडूत 10 विकेटने जिंकून इतिहास रचला. चेंडू आणि विकेट अशा दोन्ही प्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हा सर्वात मोठा विजय आहे. केनिया आणि माली यांच्यात झालेल्या या सामन्यात केनियाने 105 चेंडू राखून विजय मिळवला.

याआधी पहिला सामना 105 चेंडूत जिंकण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रियाच्या नावावर होता. त्यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी तुर्कीविरुद्ध 33 धावांचे लक्ष्य गाठण्यापूर्वी 10 विकेट आणि 104 चेंडू राखून विजय मिळवला. केनिया आणि माली यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयसीसी पुरुष T20 विश्वचषक उप-प्रादेशिक आफ्रिका पात्रता गट-1 मध्ये संपूर्ण माली संघ 30 धावांत गारद झाला.

त्यांच्याकडून थिओडोर मकालूने सर्वाधिक 12 धावा केल्या. त्याच्याशिवाय 6 फलंदाज दुहेरी आकडा पार करण्यात अपयशी ठरले, तर पीटर लॅगेटने 17 धावांत 6 बळी घेतले. लुकास ओलुचने 4 षटकात 5 धावा देत 1 बळी घेतला, तर विराज पटेलने 4 षटकात 4 धावा देत 1 बळी घेतला. प्रत्युत्तरात केनियाच्या सलामीवीरांनी एकही विकेट सोडली नाही.

पुष्कर शर्माने 9 चेंडूत 3 चौकारांसह 14 धावा केल्या तर कॉलिन्स ओबुयाने 6 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 18 धावा फटकावल्या. सामना अवघ्या 2.3 षटकांत संपला. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध, भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले दुसरे शतक ठोकले, तर टीम सौदीने 3 चेंडूत 3 विकेट्स घेत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

लसिथ मलिंगा नंतर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2 हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. दरम्यान, या सामन्यात माली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र केनियाच्या भेदक मान्यासमोर त्यांची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. केवळ 8 धावांत मालीने 6 विकेट्स गमावले. माली संघाकडून थिओडोर मेकालूने 10 चेंडूत 10 धावा काढल्या.

त्याचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आलेला नाही.मालीचा संपूर्ण संघ 10.4 षटकात 30 धावांत गारद झाला. केनियाकडून पीटर लेंगाट याने 6 विकेट्स टिपल्या. त्यानंतर केनियाने अवघ्या 2.3 षटकांत म्हणजेच 15 चेंडूत या आव्हानाचा पाठलाग केला. केनियाचा सलामीवीर पुष्कर शर्माने 14 आणि कॉलिन्स ओबुयाने 18 धावा काढत संघाला विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *