नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचा आणि त्याच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे. मात्र त्यांच्याबाबत सर्वत्र टीका होत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या निकालावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली देवून नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. तसेच त्यांनी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देखील दिली. मात्र त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं.
तर या प्रकरणात 10 व्या शेड्यूलनुसार कारवाई करता येणार नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरानी नोंदवलं आहे. ते म्हणाले की, या प्रकरणात दोन्ही गटांनी पक्ष सोडलेला नाही तसेच दोन्ही गट पक्षावर दावा करत असल्याने हा पक्षांतर्गत वाद आहे. तसेच पक्षातील 2 गटात हा वाद आहे. मात्र यामुळे पण पक्षात फूट पडलेली नाही, असं निरीक्षण विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या या निकालावर घटनातज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हास बापट यांनी मात्र टीका केली आहे. तसेच त्यांनी या राहुल नार्वेकरांच्या निकालावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “आजचा निकाल हा घटनेचं अध:पतन असून, दहावं शेड्यूल कायदा का आणला? तसेच पक्षांतरबंदी व्हावी म्हणून. हा कायदा भक्कम झाला पाहीजे.
त्यामुळे आमदारांवरून जर पक्ष ठरत असेल तर हे लोकशाहीला धोकादायक आहे. तसेच आता इथून पुढे सगळी जबाबदारी ही सुप्रीम कोर्टावर असून दुसऱ्या पक्षात त्यांचं स्वागत होतं. इथे लोकशाहीचं अध:पतन सुरु झालं आहे, अशी बोचक टीका उल्हास बापट यांनी यावेळी बोलताना केली. तसेच “शेवटचं कोर्ट हे जनता असून निवडणुकामधून लवकरच लोकांची पसंती समजेल.
ते म्हणाले की, इंदिरा गांधीनी सुध्दा देशांत आणीबाणी आणली होती, तेव्हा त्यांना सत्तेवरुन जनतेनेच दूर केलं होत. आता ठाकरे गट बरोबर की शिंदे गट बरोबर आहे किंवा शरद पवार गट बरोबर आहे की अजित पवार गट बरोबर हे जनताच योग्य वेळी ठरवेल..