22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठासाठी संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, आता या श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठासाठी सोहळ्याचेही थेट प्रक्षेपण चित्रपटगृहांद्वारे केले जाणार असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, मल्टिप्लेक्स चेन PVR आयनॉक्स लिमिटेडने 22 जानेवारी 2024 रोजी आपल्या सिनेमाच्या पडद्यावर राम मंदिरातील ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठा सोहळा थेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.
PVR INOX ने 70+ 160 चित्रपटगृहांमध्ये हा महत्त्वाचा कार्यक्रम थेट प्रसारित करण्यासाठी आज तकशी करार केला आहे. तसेच 22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 2 तासांचे स्क्रीनिंग होईल. तिकिटाची किंमत ₹100 आणि सर्व श्रेणींच्या जागांसाठी लागू कर निश्चित करण्यात आली आहे. केवळ प्राण प्रतिष्ठा समारंभाचे स्क्रिनिंगच नाही तर ₹100 किमतीची तिकिटे मोफत पॉपकॉर्न आणि ड्रिंक कॉम्बो देखील देतात. स्क्रीनिंगसाठी तिकिटे पीव्हीआर आयनॉक्स अॅप, वेबसाइट आणि इतर तिकीट प्लॅटफॉर्मद्वारे बुक केली जाऊ शकतात.
दरम्यान, देशभरात अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आता भगवान श्रीराम भक्तांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, देशभरातील बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये हा सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकराकडून सुटी देखील जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे शाळा-महाविद्यालयेही बंद राहणार असून या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील भाविक अध्योध्यानगरीत पोहोचले आहेत. तसेच या सोहळ्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण देखील केले जाणार आहे. याशिवाय, अनेकदा चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटचे सामनेही दाखवले जातात. मात्र आता अयोध्या येथील भव्य दिव्य श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचेही थेट प्रक्षेपण चित्रपटगृहांद्वारे केले जाणार असून त्यासाठीची तयारी चित्रपटगृह समूहांनी केली आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी ऑनलाइन तिकिटविक्री करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातील 9 चित्रपटगृहांतील 10 पडद्यांवर, तर मुंबईतील जवळपास 40 चित्रपटगृहांमध्ये हा सोहळा सकाळी 11 वाजल्यापासून दाखवला जाणार आहे.दरम्यान, सिटीप्राईड समूहाचे पुष्कराज चाफळकर म्हणाले, की अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण चित्रपटगृहांमध्ये केले जाणार असून त्या साठीची सगळी तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील 6 चित्रपटगृहांतील प्रत्येकी एका पडद्यावर हा सोहळा दाखवण्याचे नियोजन आहे.