राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का?, असा सवाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पार पडलेल्या एका सभेमध्ये तरुण पिढीला उपस्थित केला होता.
काही वेळा व्यक्तीला स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा असतात. तसेच राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे काही वेळा शक्य होत नसते. मात्र, राजकारणात यायला घाबरू नका. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का?, असा प्रश्न मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उपस्थित केला असल्याचे दिसून आले.
दरम्यान, MIT विश्वशांती विद्यापीठात आयोजित केलेल्या भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तरुण पिढीशी राजकारण विषयावर चर्चा केली. दरम्यान, MITचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड तसेच कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड यावेळी उपस्थित असल्याचे दिसून आले.
दरम्यान, तरुणांशी संवाद साधताना चौहान म्हणाले की, माझ्या मतदारसंघातून आतापर्यंत मी 11 वेळा निवडून आलोय. मी माझ्या मतदारसंघात प्रचार करत नाही. राजकारणातील पैशाचा प्रभाव संपवण्यासाठी राजकारणात या आणि स्वतःला ओळखा. तसेच तुम्ही तुम्हाला हवे ते मिळवू शकता. याशिवाय, स्वतंत्रपणे काम करायला मर्यादा आहेत.
राजकारणात आल्याने मोठ्या स्तरावर काम करणे शक्य झाले असेही ते यावेळेस विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलले. तसेच मात्र, त्यांनी राजकारणात यायला घाबरू नका. राजकारण काय केवळ चोरी करणाऱ्यांचे आहे का? असा प्रश्न त्यांनी देखील MIT मध्ये पार पडलेल्या सभेमध्ये उपस्थित केला.