राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेच्या प्रमुखपदी विराजमान? जाणून घ्या!!

Pune

राजेंद्र भोसले हे विक्रम कुमार यांची जागा घेतील, ज्यांची आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) चे अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्रातील काही महा नगरपालिकांच्या प्रमुखांना त्यांच्या कार्यकाळाची 3 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही कायम ठेवण्याची विनंती नाकारल्यानंतर, राज्य सरकारने शुक्रवारी 2008 च्या बॅचचे IAS अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे महापालिकेचे नवे आयुक्तपदावर नियुक्ती केली.

दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या एक दिवस आधी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राजेंद्र भोसले हे गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी होते. यापूर्वी त्यांनी अहमदनगर आणि सोलापूर येथे जिल्हाधिकारीपदही भूषवले होते. भोसले यांनी 2020 मध्ये 8 महिने पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्तपदही भूषवले होते.
दरम्यान, कुमार हे 2004 बॅचचे IAS अधिकारी आहेत.

आणि जुलै 2020 मध्ये महामारीच्या काळात त्यांची PMC आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त होते. महिनाभरापूर्वी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या नियुक्त्या केल्या. रितेश कुमार यांच्या जागी पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश किमार यांची नियुक्ती करण्यात आली, तर सुहास दिवसे यांनी राजेश देशमुख यांच्याकडून पुण्याचे जिल्हाधिकारी तर चंद्रशेखर पुलकुंडवार यांनी सौरभ राव यांच्या जागी विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *