दरम्यान, “आम्ही संशयिताची ओळख पटवण्याच्या प्रयत्न करत असून आणि त्याचे फोटो इतर पोलिस युनिट्सना माहितीसाठी वितरित केले गेले असल्याची माहिती एका स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. पुणेच्या रेल्वे स्थानकामधील आवारात आई-वडिलांसोबत झोपलेल्या 7 महिन्यांच्या चिमुरड्याचे शनिवारी पहाटे अज्ञात संशयितानी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली.
तसेच पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची ओळख श्रावण अजय तेलंग अशी केली असून त्याचे कुटुंब महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती दिली. तसेच मुलाचे आई-वडील मजूर असून ते एका नातेवाईकाला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. ही घटना शनिवारी पहाटे 2-3 च्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच “स्थानिक पातळीवरून अशी माहिती मिळाली की, हे जोडपे बाळासह पुणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर आरक्षण कार्यालय समोरील मोकळ्या जागेत झोपले होते. तसेच रेल्वे स्थानकाच्या आवारातील CCTV कॅमेऱ्यांच्या तपासणीत अज्ञात संशयिताने बाळाचे अपहरण करून आवारातून पळ काढल्याचे दिसून येते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक संदीपान पवार यांनी सांगितले.
काही वेळाने आई-वडिलांना जाग आली तेव्हा बाळ बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेत शोध सुरू केला. “दरम्यान आम्ही संशयिताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचे फोटो इतर पोलिस युनिट्सना माहितीसाठी वितरित केले गेले असल्याची माहिती एका अधिकारीनी यावेळी बोलताना दिली