राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पायउतार करा, हरभजन सिंगने जाहीर केले नवे कोच अन् कॅप्टन..

क्रीडा

काल टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला फेरीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. कारण भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या इंग्लड विरोधी सेमिफायनलमध्ये एक सुद्धा विकेट घेता आली नाही. परिणामी, भारताने दिलेल्या 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग इंग्लिश संघाने केवळ 16 षटकांत पूर्ण केला. या विजयासह इंग्लिश संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. इंग्लंडने 10 गडी राखून मोठा विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारताच्या खराब कामगिरीनंतर भारतीय संघावर विविध स्तरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच काहींनी तर कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा सल्ला भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने दिला आहे. तसेच त्यानें त्यांच्या बदसल्यास दुसरी नावे देखील दिली आहेत.

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. 4 साखळी सामने जिंकून भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चालू विश्वचषकात चाहत्यांना निराश केले.

काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील रोहित 27 चेंडूत 28 धावांची सावध खेळी करून आऊट झाला. तसेच याशिवाय, संपूर्ण विश्वचषकात रोहित धावा काढण्यासाठी संघर्ष करत होता. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकात आपल्या खेळीने सर्वांना निराश केले. हिटमॅन रोहितने विश्वचषकातील 6 सामन्यांमध्ये 19.33 च्या सरासरीने आणि 106.42 च्या स्ट्राईक-रेटने केवळ 116 धावा केल्या आहेत.

मागील वर्षापासून रोहित भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे. रोहित-द्रविड या जोडीने जागतिक स्पर्धांमध्ये भारताला गौरव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय संघाचा प्रशिक्षक असलेले द्रविड यांनी भारतीय युवा खेळाडूंना “अ” संघ स्तरावर मार्गदर्शन केले होते, तर रोहितला आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून यश मिळाले होते.

दरम्यान, गुरूवारी ॲडिलेडमध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला कारण कोणत्याच भारतीय गोलंदाला बळी पटकावता आला नाही. सुरूवातीच्या खराब फलंदाजीनंतर हार्दिक पांड्याने 63 धावांची ताबडतोब खेळी केली. ही खेळी वगळता विराट कोहलीने 50 धावांची साजेशी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाला 169 धावांचे आव्हान दिले होते.

प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स या सलामीच्या जोडीने शानदार खेळी केली. विक्रमी 170 धावांची भागीदारी नोंदवून इंग्लंडने 16 षटकांत 170 धावा करून फायनलचे तिकिट मिळवले. त्यामुळे, वर्डकपमध्ये भारतीय संघाला आलेल्या अपयशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने भारतीय संघाच्या टी-20 संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

भारताच्या पराभवानंतर मीडियाशी बोलताना माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाले की, भारताला फॉर्मेट समजून घेणारा नवा मार्गदर्शक हवा आहे आणि त्यासाठी नुकताच खेळातून निवृत्त झालेला माजी क्रिकेटपटू असावा. यासाठी माझ्या मते आशिष नेहरा ही भूमिका पार पाडू शकतो असे हरभजन सिंगने म्हटले. कारण भज्जीच्या मते, आशिष नेहरा हा एक असा खेळाडू आहे ज्याला क्रिकेटचे खूप ज्ञान आहे. नुकताच आयपीएलमध्ये गुजरात टायटन्समध्ये युवा खेळाडूंना प्रोत्साहन देत ipl टायटल मिळवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *