दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. येरवडा परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमधून एका 48 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली कारण त्याच्याकडे 2 आधारकार्ड एकच नंबर असलेली, पण वेगवेगळी नावे आणि पत्ते आढळून आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात शनिवारी FIR दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोलिसांनी सांगितले की, त्यांना हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली ज्यांना आरोपी संशयास्पद वाटला. काही वेळातच पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यास सुरुवात केली.
मग त्यांनंतर पोलिसांनी हॉटेलात सापडलेल्या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर, अधिक तपासासाठी पोलिसांनी आरोपींकडून मोबाईलसह 2 आधार कार्ड जप्त केले आहेत.
तसेच याशिवाय, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, आरोपीकडे 2 आधारकार्ड आढळून आले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यातील एक आधारकार्ड हिंदू नावाचे तर दुसरे मुस्लिम नावाचे.
“दोन्ही आधार कार्डचा नंबर एकच आहे,” असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान, आरोपीने आपला धर्म हिंदूवरून मुस्लिम केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. परंतु, पोलिसांनी सांगितले की, हॉटेलमध्ये बिले देण्यावरून त्याच्यात काही वाद झाला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांना बोलावण्यात आले होते.
तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, आरोपी मूळचा तामिळनाडूचा रहिवासी आहे . FiR मध्ये नमूद केल्यानुसार, तो आता वडगाव शेरी परिसरातील पेइंग गेस्ट (PG) सेवेत राहत होता. तसेच पोलिसांना संशय आहे की, आरोपी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करतो, परंतु त्याच्या व्यवसायाची पुष्टी करण्यासाठी चौकशी सुरू आहे. दरम्यान, पंचतारांकित हॉटेलमध्ये वेगवेगळ्या नावांची 3 आधारकार्डे घेऊन तो पुण्यात का आला?, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.