पुण्यात खुनाचं सत्र सुरुच! पोटच्या मुलांनेच केली आईचा निर्दयी हत्या..

Pune

गेल्या काही काळापासून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पुणे शहर आता गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. कारण 2 दिवसांपूर्वी आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पोटच्या पोरानेच आईचा खून केल्याची घटना समोर आली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात लागोपाठ खूनाची सत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पोटच्या पोरानेच आईचा खून केल्याची धक्कादायक घटना आज घडली.

शहरातील खडकी भागातील रेंज हिल परिसरातील घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे. गुंभाबाई शंकर पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या आरोपी मुलांचे ज्ञानेश्वर शंकर पवार असल्याचे पोलीस तपासणीसाठी समजले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पवार हा एका फॅक्टरीमध्ये काम करत होता आणि तो त्याच्या आईबरोब्बर खडकी भागात राहत होता.

तसेच आज सकाळी त्याने आईच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून जीव घेतला आणि खोली बाहेरून लॉक करून घटनास्थळापासून पळ काढली. तसेच आजूबाजूच्या लोकांना संशय आल्यामुळे त्यांनी घराजवळ पाहिले असता मृत व्यक्ती गुंभाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मग लगेच त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

तसेच नेमकी ज्ञानेश्वरने ही हत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. 10 फेब्रुवारी कालच पुण्यातील औंध भागात काही आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये अनिल ढमाले असं आत्महत्या करणाऱ्याचे नाव होतं. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तसेच डोक्यात गोळी लागल्याने आकाश जाधव यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तात्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून सध्या जाधव हे अत्यावस्थ आहेत.
सध्या शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

त्यात हत्येच्या घटनादेखील वाढत असून घरगुती वादातून एकमेकांचा सूड घेत थेट हत्या करत असल्याच्या घटना लागोपाठ समोर येत आहेत. या घटनांमुळे नात्यांमध्ये जिव्हाळा उरला आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *