पुण्यात चंद्रकांत पाटीलांच्या गाडीला विद्यार्थ्यांचा चारही बाजूने घेराव, नेमकं काय प्रकरण?

Pune प्रादेशिक

पुण्यात शहरातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालय परिसरात आज विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला. दरम्यान, यावेळी आंदोलक विद्यार्थी हे डीएडचे असल्याचे सांगितले जाते. तसच त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न असून मात्र आंदोलक विद्यार्थी इतके आक्रमक झाले होते की चंद्रकांत पाटील त्यांच्याशी संवाद साधू शकले नाहीत.

आज सकाळी डीएड-बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरात अडवल्याची माहिती समोर आली असून शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केल्याची सांगितले जात आहे. तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? असा प्रश्न सुद्धा विचारला जात आहे. त्यामुळे परिक्षार्थी आणि विद्यार्थ्यां यावेळी चांगलेच आक्रमक भूमिका घेतली असल्याची दिसून आले.

दरम्यान, विद्यार्थ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली असून विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनामुळे परिसरामध्ये काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जाते. तसेच पुण्यातील शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर गेल्या काही दिवसांपासून D.ed आणि B.ed चे विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे दिसून आले. दरम्यान, शिक्षण भरतीमध्ये इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करण्यात यावं आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशी या आंदोलक विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.

हीच मागणी घेऊन आंदोलक विद्यार्थ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील त्या परिसरात आले असता त्यांची गाडी अडवण्यात आली आणि आंदोलक विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला घेराव घातला त्यामुळे विद्यार्थी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात संवाद झाला नसल्याचे सांगितले जाते. मात्र, यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण निवळण्याचा प्रयत्न केला असून त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी पुढे सोडण्यात आली होती.

D.ed आणि B.ed चं शिक्षण झालेल्या विद्यार्थ्यांना आज नोकरी मिळणं खरंच खूप अवघड असल्याचे सांगितले जाते. तसेच अनेक विद्यार्थी नोकरीसाठी प्रयत्न करत असतात. काही विद्यार्थी खूप अंत्यत कमी पगारात काम करत असतात. तर काही विद्यार्थी आपण भविष्यात पर्मनंट होऊ? या आशेने वर्षोनुवर्षे एखाद्या शिक्षण संस्थेत कार्यरत असतात. अशा तरुणांचा नोकरीचा प्रश्न सोडवणं हे फार गरजेचं असल्याचे सांगितले जाते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *