नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुणे शहारातील ओलो- उबेर टॅक्सीचा प्रवास दर महाग झाल्यामुळे प्रवासाची तारांबळ उडायची शक्यता आहे. मात्र, यामध्ये काळी पिवळी टॅक्सीबाबत हे नियम लागू होणार नसल्यामुळे नागरिकांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे. नविन वर्षामध्ये प्रमुख प्राधिकारणाच्या बैठकीत प्रवाशांच्या हितासाठी नवीन नियम तयार करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यानुसार शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना सक्तीचा झाला आहे.
दरम्यान, आता पुणेकरांना पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातील असलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामतीत जादा पैसे मोजावे लागणार असून पुण्यामध्ये आता OlA, Uber मधून प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय, स्थानिक पातळीवरील जिल्हाधिकारींच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानाच्या बैठकीत वातानुकूलित टॅक्सीच्या भाडे वाढीला मंजुरी देण्यात आली. याआधी वातानुकूलित टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते.
त्यानंतर आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी 37 रुपये लागणार आहेत तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये दर द्यावे लागणार आहे. 1 जानेवारीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काळ्या पिवळ्या टॅक्सीचे दर अजुन वाढले नाहीत.
ही बैठक जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 22 डिसेंबर रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली होती. या बैठकीत दरवाढीला मंजुरी देण्यात आली. यामुळे हे नवीन दर आता लागू करण्यात आले आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर मागील वर्षी 17 एप्रिलला पहिल्या दीड किलोमीटरला 31 रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरला 21 रुपये करण्यात आला होता. तसेच याशिवाय, CNG चा दर हा 86 रुपये किलो होता. CNG दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीचा एप्रिलमधील दर बदलण्यात आलेला नाही.
मात्र, या खटुआ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा वातानुकूलित कॅबला तब्बल 20 टक्के दरवाढ करण्याची शिफारस केलेली आहे. या शिफारशीनुसार वातानुकूलित टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी 37 रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपये करण्यात आला आहे.
मात्र, दुसरीकडे प्राधिकारणाच्या बैठकीत प्रवाशांच्या हितासाठी नवीन नियम तयार करण्यात आले असे सांगितले जात आहे. तसेच शहरी भागांत प्रवाश्यांची ने-आण करणाऱ्या सर्व टॅक्सी चालकांकडे वैध परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. याचबरोबर, प्रवाश्यांकडून भाडे घेताना ते प्रमाणित असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे ओला-उबेरकडून ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची लूट होते. त्याला लगाम बसणार आहे.