कोथरूड पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी यशस्वी ऑपरेशन दरम्यान ‘अह उल सुफा’ संघटनेच्या दहशतवाद्यांना पकडले, ज्यामुळे 26/11 सारख्या मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता होती. या 5 कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. शुक्रवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आणि त्यांना बक्षीस रक्कम सुपूर्त करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी कोथरुडमध्ये दुचाकी चोरताना दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांनी पकडले होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे देशभरात बॉम्बस्फोट घडविण्याचा डाव उधळला गेल्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून म्हणजे NIA मार्फ़त कोथरुड पोलीस ठाण्यातील 5 कर्मचाऱ्यांना तब्बल 10 लाखांचे रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. दरम्यान, NIAचे अधिकारी इंगवले आणि पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, तसेच अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कोथरुड पोलीस ठाण्यातील अमोल नजन, प्रदीप चव्हाण, बाला रफिक शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक नीलीमा पवार यांना सुद्धा गौरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी आणि मोहम्मद आमल यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. कोंढव्यात आरोपी इम्रान खान, मोहम्मद साकी आणि मोहम्मद आमल वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांच्या घराची झडती घेतल्यावर तेव्हा त्यांचे बंदी घातलेल्या अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे धक्कादायक माहिती या तपासात उघडकीस आले होती.
तसेच राजस्थानात चितोड परिसरात त्यांच्याविरुद्ध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याचे माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून ते पसार झाले होते. तसेच तपासात तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आमल यांना अटक करण्यात आली होती आणि कोंढव्यात आरोपी साकी, खान, आमल वास्तव्यास असल्यामुळे त्यांच्या राहत्या घराची झडती घेतल्यावर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.