पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आयुक्तालयात गजा मारणेबरोबर 300 गुन्हेगारांची हजेरी..

Pune

सध्या पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे, कारण शहरातील हाय रेकॉर्डवरील सर्व कुख्यात गुंडांबरोबरच अनेक छोट्यामोठ्या गुन्हेगारांंना शहर पोलीस आयुक्तालयात बोलावण्यात आले आहे. तसेच या सर्व गुंडांना एकत्र बोलवण्याचं नेमकं काय कारण अजूनही समजले नाही.

विद्येचं माहेरघर समजले जाणाऱ्या पुणे शहरात दिवसा-ढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण असल्याचे दिसून येत आहे. कुख्यात शरद मोहोळ याची महिन्याआधी दुपारीच्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे शहरात टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा पुन्हा दबक्या आवाजात सुरू झाल्याचे दिसून आले.

मात्र त्या आधी शहराचे नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. यामध्ये प्रामुख्याने कुख्यात गुंड गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांच्यासह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली होती.

तसेच रेकॉर्डवरील असलेल्या सर्वच गुन्हेगारांनी आज ओळख परेड करण्यात आली असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी उपस्थित होते. दरम्यान, पुणे शहरातील वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जवळपास तब्बल 200 ते 300 गुन्हेगारांना आज पोलीस आयुक्तालयामध्ये हजर करण्यात आलं होतं.

तसेच आगामी निवडणुकीच्या आधी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून शहर आयुक्तांनी सर्व अट्टल गुन्हेगारांची ओळख परेड केली असल्याचे सांगितले जाते. तसेच पुणे शहरातील पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद असलेल्या सर्वांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावण्यात आलं होतं.

पुणे शहरातील कायम चर्चेत असलेले कुख्यात गुंड गजानन मारणे तसेच बाबा बोडके आणि जंगल्या सातपुते, निलेश घायवळ हे मोठे गुन्हेगार यावेळी उपस्थित असल्याचे सांगितले जाते. तसेच याचबरोबर, काही गुन्हेगार हे जामिनावर बाहेर असून तर काही प्रकरणांची चौकशी सुरू आहे अशा सर्वच कुख्यात गुंडांना उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा वापर करू नये, अशा सूचना देखील यावेळी गुंडांना दिल्या गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *