पुण्यात होणार मेगा शिक्षक भरती, 355 जागांवर होणार भरती!!

Pune प्रादेशिक शिक्षण

शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालय, पुणे शहराच्या महापालिका हद्दीत ही शिक्षकांची भरती जाहीर केली आहे. त्याद्वारे एकूण 355 पदे भरण्यात येत आहेत.

शहरातील महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या शाळांसह जुन्या हद्दीतील शिक्षकांच्या एकूण 355 जागा भरण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यासाठीच्या बिंदुनामावलीस अंतिम मान्यता मिळविण्यासाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून तो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या आसपास अनेक मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. या महापालिका हद्दीच्या शाळांमधून तब्बल 1.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक वर्षात शिक्षक भरती न झाल्याने शिक्षकांची संख्या अपुरीच आहे. शिक्षकांअभावी एकाच शिक्षकांवर 2-2 वर्गांची जबाबदारी देण्यात आली असून त्याविरोधात पालक, शिक्षकांनी वारंवार आंदोलनेही केली आहेत.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार शिक्षकांच्या 650 जागा रिक्त आहेत. मात्र राज्य शासनाने रजा मुदतीमधील 93 शिक्षकांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिका हद्दीतील शाळेतील काही आंतरजिल्हा बदली पद्धतीनुसार शिक्षक महापालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे सध्या रिक्त जागांची संख्या 355 एवढी आहे. ही पदभरती येत्या काही दिवसांत केली जाणार असल्याने शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही नविन वर्ष गोड होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, पुणे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील शिक्षकांची बिंदु नामावली तयार करून ती राज्य शासनाकडे महापालिकेने मंजुरीसाठी पाठवली आहे. राज्य शासनाने उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर झाली असून मात्र, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची बिंदुनामावली मंजूर झालेली नाही, अशी मागणी देण्यात आली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्याला मंजुरी मिळणार असल्याचे माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे.

तसेच, जुन्या महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांबरोबरच समाविष्ट गावांनाही पदभरतीनंतर शिक्षक दिले जाणार आहेत. समाविष्ट गावांतील 65 पैकी 61 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. उर्वरित शाळा येत्या काही दिवसांत हस्तांतरित होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *