पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येतं असेल, तर जाणून घ्या त्यामागील रहस्य ।। शास्त्रानुसार पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे, डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे, जांभई येणे, किंवा शिंका येणे याविषयी जाणून घ्या !

कला

श्री स्वामी समर्थ ! पूजा करताना आपल्याही डोळ्यात पाणी येतं असेल, तर जाणून घ्या त्यामागील रहस्य काही वेळेला तुम्हाला जाणवले असेल की, पूजा करताना आपल्या डोळ्यात अश्रु येतात. शास्त्रानुसार बघितले तर पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे, डोळे मिटल्यासारखे वाटणे, झोप येणे, जांभई येणे, किंवा शिंका येणे, हे एक मोठे रहस्य आहेत.

पूजा करतांना हे का होते हे खालीलप्रमाणे: पूजा करताना का येतात आपल्या डोळ्यात अश्रू, का येते जांभळी, का वाटते आपल्याला झोप आल्यासारखे, किंवा शिंका येते, हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याचे संकेत आहे का? मनाची दोलायमान अवस्था सुरू होणे,

शास्त्रामध्ये लिहिले आहे की, सच्च्या मनाने व भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करतात. त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. पण, जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की, ती व्यक्ती दोलायमान मनःस्थितीत आहे

व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत. पूजेत त्याचे लक्ष नाही विचारांची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही, जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करीत आहात तर तुम्हाला जांभळी किंवा झोप येऊ शकते,

देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुराणांत असे सांगितले गेले आहे की, जर पूजा पाठ करताना तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हाला ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहेत. जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात व पुजेत मग्न झाला असाल,

तर देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल, तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात. आपण असे म्हणू शकतो की तुम्ही केलेली त्याची पूजा सफल झाली आहेत. जी तुमच्या खुशी मुळे अश्रूंचा रूपात बाहेर येत आहे. भक्तहो महत्त्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेली गोष्ट ही नेहमीच यशस्वी होते.

नकारात्मकता असणे काही वेळा असे बोलले जाते की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातले अश्रू जांभई याचे एक कारण म्हणजे तुमच्या तरी नकारात्मकता असू शकते. जेव्हा केव्हा आपले मन पूजापाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही व शरीराला जडत्व वाटू लागते

तर तुम्ही समजले पाहिजे की कोणीतरी नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती तुमच्या आसपास नक्की अस्तित्वात आहे. व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाहीये. तुमचे चित्त विचलित करीत आहे. भक्तहो ही माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे

यामागे कोणती ही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्यात याचा उद्देश नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये. || श्री स्वामी समर्थ ||

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *