येत्या आठवड्यात पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसीय बैठकीत सरसंघचालकांनंतर संघटनेतील दुसरे सर्वोच्च पद असलेल्या RSS च्या सरकार्यवाह पदासाठी निवडणूक होणार असल्याचे सांगितले जाते. तसेच सध्या दत्तात्रेय होसाबळे हे सरकार्यवाह असून या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य घटकांच्या संघचालक प्रमुखपदासाठीही निवडणूक होणार असल्याची माहिती दिली जात आहे.
तसेच पुढील आठवड्यात पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय ‘प्रतिनिधी’ सभेची बैठक होणार असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुका आणि बंगालमधील संदेशखळी येथील महिलांचा छळ आणि मणिपूरमधील सध्याची परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच त्या 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या 3 दिवसीय बैठकीत सरसंघचालकांनंतर संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद असलेल्या RSS सरकार्यवाह या पदासाठी निवडणूक होणार असून सध्या दत्तात्रेय होसाबळे हे सरकार्यवाह आहेत. 2021 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत 3 वर्षांच्या कालावधीसाठी तसेच 1 मार्च रोजी एका निवेदनात, RSS चे राष्ट्रीय प्रचार आणि मीडिया प्रभारी सुनील आंबेकर यांनी सांगितले होते की.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभा 2023-24 मध्ये RSS स्वयंसेवक व त्याच्या विविध शाखांनी केलेल्या सर्व कामांचा व ‘सेवा कार्याचा’ आढावा घेतला जाईल. तसेच या बैठकीत ‘स्वयंसेवकां’च्या प्रशिक्षणासाठी नवीन ‘संघ शिक्षा वर्ग’ योजना राबविण्याबाबत व संस्थेचे कार्य व क्षेत्र विस्ताराच्या योजनांवरही चर्चा होणार असून 2025-26 मध्ये संघाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जाते तसेच महत्त्वाच्या विषयांवरही प्रस्ताव मंजूर केले जातील.
याचबरोबर सूत्रांनी सांगितले की, 45 ‘प्रांत’ युनिट मधील किमान 1,500 RSS स्वयंसेवक व पदाधिकारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. तसेच या बैठकीला सर संघचालक मोहन भागवत व सरचिटणीस होसाबळे उपस्थित राहणार।असल्याचे देखील सांगितले जात आहे. तसेच या बैठकीत विश्व हिंदू परिषदेसह सर्व 40 RSS संलग्न संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.