राज्यात पुढील 30 वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार राहणार असा विश्वास राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटते की, 30 वर्षे सत्ता राहावी. पण जनता निर्णय घेते. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते, असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच ते म्हणाले की, हवेची दिशा मी कधीच पाहत नाही, त्यापेक्षा माणसं आणि पक्ष पाहून मी काम करतो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटत असेल 30 वर्ष सत्ता राहावी, पण जनता निर्णय घेत असते, असेही मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. याशिवाय, पुढील 30 वर्ष राज्यात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. कारण जनता आमच्यासोबत आहे, असा दावा पण मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
दरम्यान, काल पार पडलेल्या एका कार्यक्रमात पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी आजची पुण्यातील हवा थंडगार आहे अशी मिश्किल टिप्पणी सुद्धा अब्दुल सत्तार यांनी केली. तसेच, काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक दावे केले. तसेच एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप देखील केला.
त्यावर बोलतांना अब्दुल सत्तार आपली प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य असून युती का तोडली? याचं उत्तर द्यावे ठाकरे आधी द्यावे. तसेच आजही पक्षप्रमुख म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री, आम्ही सर्वजण दैवत मानतो. तर उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
त्यामुळे उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार आहेत मात्र न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. जेवढा संख्याबळ आमच्याकडे होत तेवढंच संख्याबळ अजित दादा यांच्याकडे असल्यामुळे आमच्या सारखाच निर्णय अजित पवार यांच्या बाबत लागेल असं त्यांना वाटतं.
तसेच त्यांनी यावेळी सदाभाऊ खोतावर सुद्धा निशाणा साधला. कोणत्याही शेतकऱ्यांचा माल योग्य दरात आपण मार्केटयार्डमध्ये घेतो, त्यामुळे माझ्या निर्णयावर सदाभाऊ खोत यांची लायन्स घेण्याची गरज नाही, असा निशाणा त्यांनी सदाभाऊवर साधला. तसेच हातकणंगले लोकसभा शिवसेनेची आहे आणि तिथं आमचे खासदार धैर्यशील माने खासदार आहेत. त्यामुळे हातकणंगले जागा सदाभाऊ यांनी मागण्याचा संबंधच येत नाही, असा दावा त्यांनी यावेळी केला.