तुमचा पोट साफ होत नाहीये? ।। घरगुती उपाय ज्यामुळे पोट साफ होते अगदी 2 मिनिटांत ।। जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात !

आरोग्य शिक्षण

आज आपण पाहणार आहोत की अगदी दोन मिनिटात आपण आपलं पोट कशा प्रकारे साफ करू शकतो. जर तुमचं पोट साफ होत नसेल, तुम्हाला शौचास साफ होत नसेल, पोटाच्या समस्या असतील त्यासाठी अगदी सहज, साधे आणि सोपे उपाय आहेत. त्यापूर्वी काही सूचना.

आपलं पोट नक्की का खराब होतं? हे आधी जरा समजून घ्या. आहार, विहार आणि आपलं मन या तीन गोष्टी याला कारणीभूत आहेत. आपण जर तेलकट, तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खात असू, जर आपल्या आहारामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स प्रमाण जास्त असेल. फास्ट फूडचे प्रमाण जास्त असेल तर आपल्याला पोटाचे विकार हे होणारच.

आपलं पोट साफ होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट विहार आपल्या शरीराची हालचाल व्हायला हवी. त्यासाठी आपण सकाळी चालायला (मॉर्निंग वॉक) किंवा हलके फुलके व्यायाम प्रकार योगासने करायला हवेत. सकाळी वेळ नसेल तर किमान सायंकाळी चालणे (इव्हीनिंग वॉक) सुध्दा आपण करू शकतो.

थोडक्यात शरीराची हालचाल व्हायला हवी आणि तिसरी गोष्ट आपलं मन, आपला मेंदू. ज्या लोकांच्या जीवनामध्ये तान तनाव आहे, टेन्शन्स आहेत. त्या लोकांनी किती जरी व्यायाम केला आणि किती जरी त्यांनी आपल्या शरीराची हालचाल ठेवली. आहार कितीजरी योग्य प्रकारे घेतला, तरी देखील या तणाव मुळे त्यांना हे पोटाचे विकार होत आहेत.

अपचन होत असतात. परिणामी पोट साफ होण्यासाठी या तीन गोष्टी लक्षात ठेवा. पोट साफ करण्याचा उपाय कोणता आहे. तीन ते चार उपाय मी तुम्हाला सांगू इच्छितो, पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या परिसरामध्ये जर सिताफळाचे झाड असेल, तर त्याचं फक्त एक पान आपण दररोज सकाळी उठल्यानंतर सेवन करायचे आहे.

ब्रश करून झाल्यावर आणि चहा पिण्यापूर्वी आपण हे पान घेऊ शकता. पान चघळून खा. चावून खा. त्याचा चोथा सुध्दा गिळुन टाका. ज्यांना खूपच त्रास होतोय त्यांनी 2 पाने वापरली तरी चालेल. त्याचे कोणतेही दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होत नाहीत.

दुसरी गोष्ट जर सिताफळ आपल्याकडे उपलब्ध असेल तर आंब्याचे झाड, माझ्या मते महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आहे. भारतात देखील बर्याच ठिकाणी आढळतात. तर आंब्याचं देखील आपण एक पान जर दररोज सकाळी सेवन केलं तरी देखील आपला कोठा साफ होईल. आपलं पोट साफ होईल.

तिसरी गोष्ट एरंडेल तेल, कोरा चहा. कोरा चहा तयार करायचे आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा एरंडेल तेल टाकायचे. ते चांगले ढवळून घ्या आणि हे मिश्रण तुम्ही प्या. हा उपाय आपण आठवड्यातून फक्त एकदा किंवा ज्यास्तीत ज्यास्त दोनदा करायचा आहे त्यापेक्षा ज्यास्त करू नका.

आपल्याला हगवन लागू शकते. आणि ती लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. ज्यांना पोट साफ होण्याचा खूपच त्रास आहे. फक्त त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे.

चौथा उपाय आहे तो खूप साधा उपाय आहे. आपण सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता, ब्रश देखील न करता एक ग्लासभर किंवा शक्य असेल तर दोन ग्लास जास्तीत जास्त ग्लास कोमट पाणी प्यायचे. पाणी कोमट असाव. आपलं पोट साफ होईल यात अनेक जण असं म्हणतात की असं कोमट पाणी पिल्याने त्यांना मळमळते उलटी आल्यासारखे वाटते.

तर ब्रश केल्यानंतर हे पाणी पिले तर चालणार नाही का? तुम्हाला मळमळ होते उलटीची भावना होते याचे मुख्य कारण असं की आपण आधल्या रात्री झोपताना ब्रश न करता झोपतो आणि परिणामी आपल्याला ही ते पाणी पिलं तर मला मालमल्याची भावना होते. तर आपण रात्री झोपताना ब्रश करा आणि मग नंतर सकाळी हा उपाय आपण करू शकता आपली मळमळ अजिबात होणार नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *