पिंपरी : विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करणारी टोळी अखेर पोलिसांच्या ताब्यात..

Pune

दरम्यान, विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करुन ते वाढीव दराने विक्री करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. तसेच विमानाच्या इंधानाचा काळा बाजार करुन वाढीव दराने विक्री करणाऱ्या एकूण 5 जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. दरम्यान, सोमाटणे टोल नाक्याजवळ काळा बाजार सुरु असताना बुधवारी पुणे पोलिसांनी कारवाई करत इंधनाचे 2 टँकर ताब्यात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

यामध्ये, मंगेश सखाराम दाभाडे, वय 42, रा. तळेगाव दाभाडे तसेच इलाही सैफन फरास, वय 45, रा. धानोरी, पुणे, अनिल सतईराम जस्वाल, वय 28, रा. उत्तरप्रदेश, अमोल बाळासाहेब गराडे वय 31, रा. पिंपळखुटे, ता. मावळ आणि परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, हे लोकं सोमाटणे टोल नाक्याजवळ विमानाला लागणारे इंधन एटीएफ/जेट इंधन टँकरमधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची टीप शहर पोलिसांना मिळताच त्यानुसार योग्य नियोजित छापा मारून कारवाई केली. तसेच जागा मालक मंगेश दाभाडे याने टँकर चालक ईलाही व अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल व परशुराम याच्या मदतीने टँकरमधून जेटइंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले होते.

याचबरोबर, इंधन भरलेले टँकर नवी मुंबई येथील JNPT बंदरातून पुणे विमानतळावर जात होते. तसेच टँकरमध्ये इंधन भरताना इंधनाच्या पृष्ठभागावर तवंग येतो. त्याच वेळी टँकरमधील इंधनाची मोजणी केली जाते. टँकर जेव्हा पुणे विमानतळावर येतो तेव्हा तवंग कमी झालेला असतो. त्यामुळे त्याची पातळी कमी दाखवली जाते.

या तांत्रिक अडचणीचा फायदा घेत आरोपींनी घेतला. हजारो लिटर इंधन भरलेल्या टँकरमधून 70 ते 80 लिटर इंधन काढून घेतल्यास कोणालाही संशय येत नव्हता. तसेच आरोपी चोरीचे इंधन काळ्या बाजारात चढ्या दराने विकत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर, आरोपींकडून 1540 लिटर ATF/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण 1,65,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दरम्यान, मुख्य आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *