पत्रकारांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयुक्तांना खडेबोल सुनावले, कारण..

Pune

चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. कारण राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नव्हते. पत्रकारांनी हा विषय मांडताच अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना या प्रकरणाबाबत खडेबोल सुनावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोखठोक स्वभावामुळे ते ओळखले जातात. दरम्यान चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना आज अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. पुण्यातील एका राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नव्हतं. तर त्यांना लांब ठेवले जात होतं.

कारण मागील आठवड्यामध्ये पिंपरीमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आयुक्त विनयकुमार चौबे यांना सांगितले होते.
मग त्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून लगेचच पत्रकारांसमोर खडे बोल सुनावले.

यामध्ये पवारांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेना चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी पत्रकारांची पोलीस अडवणूक केली जात जाते, ही घटना वारंवार समोर आलेले आहे. तसेच गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना समोरासमोर बोलवून सांगितले देखील होते. मात्र त्यानंतरही आज पुन्हा तोच प्रकार घडला.

शनिवारी पिंपरी- चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये अजित पवार यांचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पवारांचा बाईट घेण्यासाठी पुढे सरसावले. मात्र पोलिसांनी पत्रकारांना पुढे जाऊ दिलेच नाही. यामुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड पोलीस प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची अडवणूक करत आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे…

दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्रकारांनी हा विषय मांडलाच मग त्यानंतर पवारांनी पत्रकारांच्या समोरच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तसेच पत्रकारांचा तो अधिकार आहे. त्यांना अडवू नये, संबंधित नेते बोलायचे की नाही ते ठरवतील असे म्हणत त्यांनी विनयकुमार चौबे यांना चांगलेच खडसावले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *