नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” पारायण केल्याने काय होते? तर सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेलच. व अनेकदा कानावरही पडला असेल. खासकरून दत्तजयंती, अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिन, किंवा शेगाव गजानन महाराजांचा प्रगट दिन. यावेळी पारायण हमखास केले जातात. काय असते पारायण? का करावे? काय मिळते पारायण करून?
आणि विशिष्ट संत चरित्राचे पारायण का करावे?परायण राहणे म्हणजे पारायण करणे होय पारायणाची किती प्रकार असतात हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो. तर पारायण करण्याचे चार प्रकार असतात ते म्हणजे एक ते एकवीस (१ ते २१) अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे.
म्हणजे एक दिवसात २१ अद्याय वाचून पूर्ण करणे. रोज १अध्याय प्रमाणे २१ दिवसात २१ अध्याय पूर्ण करणे. दुसरं असत रोज तीन अध्याय प्रमाणे सात दिवसात २१ अध्याय पूर्ण करणे. तिसरं असते रोज ७ अध्याय प्रमाणे, ३ दिवसात २१ अध्याय पूर्ण करणे.
सहसा अनेक लोक हे रोज तीन अध्याय प्रमाणे सात दिवसात २१ अध्याय पूर्ण करतात. तुम्हाला आता एक प्रश्न पडला असेल की, पारायण करताना कोणते पथ्य पाळणे आवश्यक असते. ते खालीलप्रमाणे. एक वेळ ठेवून वाचन करणे. म्हणजे जर आज सकाळी तुम्ही ७ ला पारायणास बसला आहात, तर उद्या ही त्याच वेळी पारायण सुरु करणे.
मग ते सात दिवसांचे असुद्यात किंवा तीन दिवसाचे असू द्या. तुम्ही सकाळी सातच्या वेळ ठेवला आहे, तर तुम्ही सात वाजेला परायनाला बसायला हवे. असे नाही की तुम्ही आज सात वाजता केली उद्या नऊ वाजता नंतर अकरा वाजता पारायणाला सुरुवात केली.
तर अस करू नका. नियांचे पालन करा. जर तुम्ही ७ वाजता परायनाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशीही सात वाजताच पारायण करावे. नंतर एकभुक्त रहाणे व एक कडधान्य खाणे. म्हणजे जर तुम्ही रोज उपवास करतात आणि सायंकाळी उपवास सोडतात तर तुम्ही मुगाच्या डाळीचे वरण व पोळी असेल तर सातही दिवस तेच खावे.
त्यात बदल करू नये. जर तुम्ही एखादी कोणती डाळ आणि पोळी किंवा भाकरी तुम्ही पहिल्या दिवशी खात असाल तर तुम्ही सातही दिवस तेच खायचे. दुसरे त्यात बदल करू नये. यानंतर पायात चप्पल न घालने. बरेच लोक ७ही दिवस म्हणजे जेवढे दिवस पारायण करतात तेवढे दिवस पायात चप्पल घालत नसतात.
पण बरेच लोक आजकाल नोकरी करतात धंदा करतात किंवा घरातून बाहेर पडतात. तर ते लोकांकडून हा नियम पाळला जात नाही. शक्यतो पाळा जर नाही जमला तर नाही पाळला तरी चालते. सर्व दिवस काया वाचा मने किंवा ब्रह्मचर्याचे पालन करणे. साध्या चटईवर वर किंवा कामाळावर झोपणे. सतरंजीवर झोपणे.
म्हणजे बेडवर, पलंगावर झोपायचा नाही. सोफ्यावर बसायचं नाही. बसायचे असेल तर जमिनीवर बसायचं. झोपायचे असेल तर जमिनीवर सतरंजी टाकून झोपायचं. असे नियम यांचे पालन करावे लागतात खोटे बोलायचे नाही. संपूर्ण लक्ष फक्त ईश्वरावर केंद्रित करणे.
या नियमांचे तुम्ही कठोरतेने पालन करावे. यात परायण म्हणजे दक्ष राहणे म्हणजे पारायण होय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय मिळते हे पारायण करून. तर याचे उत्तर म्हणजे पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे म्हणजेच स्वामींकडे आपल्या गुरुंकडे सांगणे असते.
म्हणजे त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय. बळाने कितीही हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच, गुरुलाच, आपल्या स्वामीनाथ समजते. तसेच आपल्या भक्तांसाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो. आपण केवळ तेच संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे असते. पण तेही नियमात राहून.
आपण कासवा प्रमाणे सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजे पारायण असते. मग जेव्हा लहान मुलं पोळी लाटतात मग आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते. तसा ईश्वरही आपली दखल घेतोच म्हणून करावे पारायण.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न व मंगलमय आणि शुद्ध होते. तर तुम्ही जेव्हा ही पारायणाला सुरुवात कराल तर पारायण वाचण्याआधी तुम्ही संकल्प सोडा. हातात पाणी घेऊन त्या ताटात पाणी सोडा. आणि जी पण इच्छा असेल जे पण संकट असतील, ज्या पण समस्या असतील त्या गुरूला बोला, स्वामींना बोला.
आपल्या ईश्वराला बोला आणि मग पारायणाला सुरुवात करा. आणि मग नक्कीच हा संदेश तुमची इच्छा देवापर्यंत पोहोचेल आणि पारायण झाल्यानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होतील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.