पाण्याच्या थकीत देयकांवर एप्रिलपासून 1% दंड आकारणी करण्याचा महापालिकेचा निर्णय..

Pune

व्यावसायिक आणि निवासी मिळकतीकडून पाणी देयके भरण्यास टाळाटाळ केली जात असल्याने तसेच त्यामुळे आता देयके न भरणाऱ्या मिळकतींना प्रतिमहा 1% दंडात्मक व्याज आकारणीचा निर्णय पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच व्यावसायिक आणि निवासी मिळकतीकडून पाणी देयके भरण्यास अनेकवेळा टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे आता देयके न भरणाऱ्या मिळकतींना प्रतिमहा 1% दंडात्मक व्याज आकारणीचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच शहरातील व्यावसायिक आणि निवासी पाणीपट्टीची थकबाकी तब्बल 650 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्याचे सांगितले जाते.

याआधी आतापर्यंत थकबाकीच्या रकमेवर व्याज आकारले जात नसल्याने थकबाकीची रक्कमही वाढत असल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामुळेच पाणीपट्टीची रक्कम 31 जानेवारीपासून पुढील 60 दिवसांत न भरल्यास थकबाकीच्या रकमेवर 1% दंड आकारण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने केला असून या प्रस्तावाला महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनीही मंजुरी दिली असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच त्यानुसार ही मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात येणार असल्याने त्यामुळे त्यानंतर थकबाकीच्या रकमेवर 1% दंड आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली आहे. याशिवाय, महापालिकेकडून रेल्वे, छावणी परिषद आणि पुरातत्त्व विभागाच्या मिळकती, केंद्र तसेच राज्य शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालयांना पाणीपुरवठा केला जातो.

तसेच या कार्यालयांना महापालिका केवळ पाण्याची देयके पाठविते. मात्र ही कार्यालये नागरिकांना विविध सेवा देत असल्याने त्यावर कारवाई करता येत नाही. याचशिवाय या कार्यालयांकडून अनेक वेळा पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ केल्यामुळे या कार्यालयांना वारंवार नोटीस देऊनही त्यांच्याकडून पाण्याची थकबाकी भरली जात नव्हती.

तसेच हा दंड केवळ व्यावसायिक पाणी मीटर असलेल्या थकबाकीवर आकारला जाणार आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टीनेही या निर्णयाचा फायदा होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात यावेळी आला. तसेच जलमापकाद्वारे पाणीपुरठा होणाऱ्या ग्राहकांना महापालिकेकडून देयके पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काही ग्राहकांना देयके न मिळाल्यास त्यांनी 31 जानेवारीपर्यंतची देयके लष्कर, स्वारगेट, एसएनडीटी-चतु:श्रृंगी पाणीपुरवठा विभागाकडून घ्यावीत आणि 31 मार्चपूर्वी थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *