नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” पाण्याचा माठ जर घरात योग्य दिशेला ठेवलेला असेल तर घरात कधीच पैश्याची कमतरता जाणवत नाही. तसच पाणी पिण्याचा माठ योग्य दिशेला,योग्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातील वास्तू दोष नाहीसा होतो आणि मठातील पाणी पिण्याचे फायदे म्हणजे आरोग्यदायी जीवन होय.
मग असा हा आरोग्यदायी माठ जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर कोणत्या दिवशी खरेदी करावा?तसच घरातील कोणत्या दिशेला व कोणत्या कोपऱ्यात ठेवावा? उन्हाळा सुरू झाला की सगळेजण माठ खरेदी करतात कारण माठातील थंडगार पाणी पिण्यासारखी दुसरी मज्ज्या नाही.
सद्द्याच्या जगात फ्रिज आणि वॉटर कुलर असले तरी माठातील पाण्याची मज्या काही वेगळीच असते.बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माठ खरेदी करण्याचा मुहूर्त,दिवस कोणता आहे? तर तुम्ही कोणत्याही सोमवारी माठ खरेदी करू शकता.ज्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करून घरी आणाल त्या दिवशी तो साद्या पाण्याने भरून ठेवा.
नंतर त्या माठाची पूजा करा आणि मग दुसऱ्या दिवशी तो माठ पिण्याच्या पाण्यानी भरा.हा पाणी भरलेला माठ योग्य दिशेला ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं.तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याचं बरोबर घरात काही दोष असतील तर ते सुद्धा निघून जातात.
वस्तू शास्त्रानुसार पिण्याच्या पाण्याचा माठ हा जर तुम्ही ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवलात तर त्याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतात. तसच घरात सकारात्मक ऊर्जाही चांगली राहते.त्याच बरोबर घरात पैशाची कमतरताही जाणवत नाही.हा माठ कधीच रिकामा ठेवू नका हे तितकंच महत्त्वाचं.
कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त तो नेहमी भरलेला असावा.बऱ्याच वेळेस अस होत की,घरात आपण माठ घेवून येतो आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही.काही दिवसात त्या माठाला तडा जातो आणि तेव्हा आपल्याला वाईट वाटत की काही तरी वाईट घडेल असे.
जर सारखे मथळा माठाला तडे जात असतील तर घरात वास्तू दोष असण्याची शक्यता असते.तसच बरेच लोक माठ बदलतात आणि जुना माठ फोडतात अस कधीच करू नये.त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या बागेत कुंड्यांसाठी करू शकता.आपल्या घरातील उत्तर दिशेला माठ ठेवायला जागा नसेल तर तुम्ही तो कोणत्याही दिशेला ठेवू शकता.
फक्त दक्षिण दिशा सोडून,पण ज्या ठिकाणी गॅस किंवा चूल पेटवतो म्हणजेच जिथे अग्नी प्रज्वलित होते तिथे माठ कधीच ठेवू नये. त्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते अशी मान्यता आहे.म्हणजेच थोडक्यात काय तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
दक्षिण दिशेला माठ कधीच ठेवू नये कारण दक्षिण दिशा ही नकारात्मक दिशा आहे.ती यमाची दिशा आहे त्यामुळे या दिशेला माठ ठेवल्यास घरातसुद्धा नकारात्मकता येवू शकते आणि अस पाणी पिल्यामुळे घरात सतत भांडण होण्याची शक्यता असते.जर ईशान्य किंवा उत्तर दिशेला जागा नसेल तर तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला माठ ठेवू शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.