भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिकेचा तिसरा आणि अखेरचा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला, जो पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर बरोबरीत सुटला आहे.
दरम्यान, ऋषभ पंतसाठी टी-20 क्रिकेट काही खास राहिलेले नाही. T-20 वर्ल्ड कपमध्ये पंतला भलेही संधी मिळाली नसली तरी 2-3 मॅचमध्ये मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा त्याला घेता आला नाही. तसेच याशिवाय, सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या T-20 मालिकेत देखील ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. तिसऱ्या सामन्यात तो 11 धावा करून बाद झाला.
दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने 6 धावा केल्या. या मालिकेत संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम खेळताना 160 धावा केल्या होत्या.
डेव्हन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स यांनी अर्धशतके ठोकली. त्याचवेळी अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजने 4-4 विकेट घेतल्या. 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. अशा स्थितीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायचा आहे. 25 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत 2022 मध्ये 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ एक अर्धशतक करू शकला. यावरून त्यांच्या सरासरी कामगिरीचा अंदाज लावता येतो. त्याला टी-20 विश्वचषकात 2 सामन्यात संधी मिळाली.
यादरम्यान त्याला केवळ 3 आणि 6 धावा करता आल्या. पंतने यावर्षी 21 च्या सरासरीने 364 धावा केल्या. स्ट्राइक रेट 133 होता. नाबाद 52 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. दुसरीकडे, इशान किशनने 2022 मध्ये 16 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 476 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि स्ट्राइक रेट 128 आहे. ईशानने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये 36 आणि तिसऱ्या सामन्यात 10 धावा केल्या.
दरम्यान, आजच्या तिसऱ्या सामन्यांत पुन्हा एकदा पंतने खराब कामगिरी केल्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गेल्या सामन्यातही त्याच्या खराब कामगिरीबद्दल चाहत्यांनी त्याची खरडपट्टी काढली होती. याआधी, पंतला T20 विश्वचषकातही दोन संधी देण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये त्याने अवघ्या 9 धावा केल्या होत्या.
न्यूझीलंड दौऱ्यातही त्याची हीच कामगिरी दिसून येते. दरम्यान पंत सतत संधी गमावत असल्यामुळे त्याच्यावर क्रिकेटप्रेमी टीका करत आहेत. खासकरुन संजू सॅमसनचे चाहते मोठ्या प्रमाणात टीका करत असून संजूला संधी मिळत नसल्यामुळे त्यांची निराशा झळकत आहे. तर नेटकऱ्यांनी शेअर केलेले खास पोस्ट पाहूया. सॅमसनला फक्त 6 सामने मिळाले.
संजू सॅमसनला यावर्षी टीम इंडियाकडून फक्त 6 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली. पंत आणि दिनेश कार्तिक यांची टी-20 विश्वचषकात यष्टिरक्षक म्हणून निवड झाली होती. दोघांची कामगिरी खराब होती. सॅमसनने 6 सामन्यात 45 च्या सरासरीने 179 धावा केल्या आहेत. अर्धशतक केले आहे.
स्ट्राइक रेट 158 आहे. सॅमसनला संधी मिळाल्यावर त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे, हे या रेकॉर्डवरून स्पष्ट होते. आयपीएल 2022 मध्ये बॅटने चांगली कामगिरी करण्यासोबतच त्याने राजस्थान रॉयल्सला कर्णधार म्हणून अंतिम फेरीत नेले.
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही संजू सॅमसनला संधी न देण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. सलग किमान 10 सामन्यांमध्ये संधी मिळावी, असे त्याने म्हटले होते. त्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा.