पक्षांतरबंदी कायद्या आमदार निलेश लंकेंसाठी ठरू शकते मोठी अडचण!!

प्रादेशिक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे मतदार संघातील आमदार नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, कारण आमदार निलेश लंके व शरद पवार यांची गुरुवारी भेट झाली. मात्र अजूनही थेट पक्षप्रवेश झाला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंकेचां राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना आमदार निलेश लंके आणि शरद पवार यांची गुरुवारी भेट झाली होती.

मात्र थेट पक्षप्रवेश झाला नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच आमदार लंके यांनी नुकताच पत्रकार परिषदेत म्हणाले की, माननीय शरद पवार यांच्या विचारसरणी मला नेहमीच मान्य आहे. त्यामुळे ते मनाने शरद पवार यांच्यासमवेत असल्याचेही स्पष्ट दिसून येते. तसेच दरम्यान, आमदार निलेश लंके यांनी पक्ष प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सांगितले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे आमदार निलेश लंके यांचा पक्ष प्रवेश तूर्त टळला असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्या समवेत गेलेले आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी मात्र आमदार निलेश लंके यांच्या भेटीनंतर ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत निलेश लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार असून ते जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र या तिघांंनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

मात्र प्रवेशाबाबत थेट बोलणे टाळले असल्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा संभ्रमही कायम असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर, आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती दौऱ्यात प्रतिक्रिया दिली होती. यामध्ये त्यांनी निलेश लंके यांनी कोणत्याही प्रकारची चुकीची भूमिका घेऊ नये.

त्यांची चुकीची भूमिका घेतल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आमदारकी रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळेच आमदार निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील प्रवेश तूर्त टळल्याचे सांगितले जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *