pak

धक्कादायक, तर पाकिस्तानचा संघही 2023 मधील विश्वचषकमध्ये सहभागी होणार नाही, PCB चेअरमनचे वक्तव्य..

क्रीडा

दरम्यान, काही दिवसापूर्वी BCCI चे सेक्रेटरी जय शहा यांनी 2023 मध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारत पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे बीसीसीआयचे यांनी स्पष्ट केले आहे. याआधी टीम इंडिया या मालिकेसाठी पाकिस्तानला जाऊ शकते, अशी अटकळ होती. बीसीसीआयच्या मंगळवारी झालेल्या एजीएममध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

आशिया कप 2023 चा मुद्दा यापैकी एक होता. जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत तसेच ते आशियाई क्रिकेट परिषदेचेही अध्यक्ष आहेत. जय शहा यांनी सांगितले होते की, ” आशिया चषकासाठी आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, आशिया चषक स्पर्धेसाठी आम्ही पाकिस्तानात जाणार नाही, आशिया चषकासाठी एखादे तटस्थ ठिकाण निवडणे हि काही मोठी गोष्ट नाही.”

त्यामुळे आता रमीझ राजा यांनी बीसीसीआयला चांगलेच धारेवर धरले आहे. मग चला तर जाणून घेवू काय आहे संपूर्ण प्रकरण… दरम्यान, आपले आणि पाकिस्तानमधील परस्पर संबंध कोणापासूनही लपलेले नाहीत. त्यामुळे, गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देश एकमेकांना भेटलेले नाहीत.

दुसरीकडे, नुकतेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी विधान केले की, “2023 साली पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही आणि आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलून यूएईला जाऊ शकते, कारण पाकिस्तान दौऱ्याचा निर्णय हा बीसीसीआयचा नसून भारत सरकारच्या हातात आहे.

त्यानंतर PCB चेअरमन रमिझ राजा यांचे विधान आले की, हे विधान हलके घेतले जाणार नाही आणि ICC बैठकीत यावर चर्चा केली जाईल. तसेच त्यानंतर सर्वजण वर्ल्ड कपमध्ये व्यस्त झाले. आता विश्वचषक संपत आला असताना, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत मोठे विधान केले आहे.

उर्दू न्यूजशी बोलताना रमीझ राजा यांनी बीसीसीआय आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबाबत जोरदार वक्तव्य केले आहे. राजा म्हणाले की, जर भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करत नसेल तर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा दौरा करणार नाही.

दरम्यान, pcb चे चेअरमन रमीझ राजा पुढे म्हणाले की, “पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ सहभागी झाला नाही, तर भारतातील विश्वचषक कोण पाहणार? आमचा हेतू स्पष्ट आहे, भारतीय संघ इथे आला तरच पाकिस्तानी संघ भारतात जाईल. विश्वचषक खेळायला.” हे तेव्हाच घडेल जेव्हा पाकिस्तान संघ चांगली कामगिरी करेल. 2021 च्या विश्वचषकात आम्ही भारताला पराभूत केले,

2022 च्या आशिया कपमध्ये आम्ही भारताला पराभूत केले. एका वर्षाच्या कालावधीत, आम्ही एक अब्ज डॉलरच्या संघाला दोनदा पराभूत केले. पण आता पण आता भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी फक्त एका वाक्यात पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची बोलती बंद केली आहे.

यावेळी भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ” क्रीडा विश्वात भारत ही एक मोठी शक्ती आहे आणि कोणताही देश आता भारताकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *