नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” अमावस्येच्या रात्री घराच्या या कोपऱ्यात लावा एक दिवा, माता लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी. घरी होईल पैशांची सुरुवात. आज इथे तुम्हाला एक असा ज्योतिषी उपाय सांगणार आहोत की, जो केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा टिकू लागेल, पैसा येण्याचे नव नवीन मार्ग खुले होतील.
तुम्ही खूप कष्ट करत आहे, मेहनत करत आहे मात्र तुमच्याकडे पैसा च येत नसेल तर काहीही करून तुम्हाला पैशांची प्राप्ती होत नसेल तर हा एक अतिशय साधा सोपा टोटका आपण अमावस्येच्या रात्री नक्की करा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही खर्च येत नाही.
फक्त आपल्या मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. मित्रांनो अमावस्येचा दिवस तांत्रिक क्रियांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो, ज्या प्रकारे ग्रहणे येतात अगदी त्याच प्रकारे अमावस्येच्या दिवशी सुद्धा असे काही ज्योतिषी उपाय करता येतात.
त्यांचा परिणाम खूप लवकर दिसतो आणि अतिशय प्रभावी अशा प्रकारचे हे उपाय असतात. मित्रांनो जर त्यांच्या घरामध्ये पैसा येत नसेल पैसा येण्याचे मार्ग खुले होत नसतील आणि आलेल्या पैशाला पाय फुडत असतील म्हणजेच आलेला पैसा या ना त्या कारणाने जर बाहेर पडत असेल तर मित्रांनो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती नाही हे असं समजुन जा.
आणि आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय या दिवशी करू शकता. मित्रांनो आज इथे तुम्हाला अमावस्येच्या रात्री करावयाचे उपाय सांगणार आहोत. सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळल्या नंतर अमावस्येच्या रात्री आपण हा उपाय करायचा आहे.
त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या घराची साफसफाई करायची आहे. स्वच्छता करायचे आहे. कारण माता लक्ष्मीला साफसफाई अत्यंत प्रिय असते. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी वास करते. अस्वच्छ ठिकाणी माता लक्ष्मी एकही दिवस टिकत नाही.
म्हणून आपण आपल्या घराची, आपल्या परिसराची संपूर्ण साफसफाई करायची आहे. घरासमोर सुंदर रांगोळी काढायचे आहे आणि माता लक्ष्मी च्या आगमनास आपलं घर स्वच्छ करायचा आहे. मित्रांनो त्यानंतर आपण आपल्या घरातील जो ईशान्य कोपरा आहे म्हणजेच पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्या मधील जी दिशा आहे.
आपण ईशान्य दिशा म्हणतो, तर आपल्या घराचा ईशान्य कोपरा आपण शोधा आणि आणि या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुटलेला फुटलेला नसावा. यामध्ये आपण देशी गाईचा तूप टाकणार आहोत. जर देशी गाईचे तूप नसेल तर इतर कोणतेही गाईचे तूप चालेल.
मात्र इतर प्राण्यांचं जसं की म्हैस असेल तर ते तुप अजिबात वापरू नका. या ठिकाणी आम्ही गाईच्या तुपाचा आग्रह या कारणास्तव करत आहोत कारण गाईला आपण गोमाता असं म्हटलेलं आहे आणि या गोमाते मध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात.
अशा या गायीच्या तुपाने आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर या दिव्यातून कोणत्याही प्रकारे तुपाची गळती होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. दिवा स्वच्छ असावा. या ठिकाणी आपण जी वात तयार करणार आहोत ही वात आपण लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करायची आहे.
लाल रंगाचा धागा वापरुन आपण या दिव्याची वात तयार करणार आहोत. हा दिवा प्रज्वलित केल्या नंतर त्यामध्ये थोडेसे केशर सुद्धा त्याला टाकायचे आहेत. केशर त्यांचा रंग लाल असतो, लाल रंगाचा धागा आणि लाल रंगाची केशर याकरता वापरत आहोत कारण लाल रंग हा माता लक्ष्मी अत्यंत प्रिय रंग आहे.
या रंगाचा वापर केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपणास फार लवकर प्राप्त होते. अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण मनोभावे हात जोडायचे आहेत आणि हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. मित्रांनो हा महालक्ष्मी बीजमंत्र आहे. ह्या मंत्राचे केवळ उच्चारणाने माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन होईल.
माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल आणि तिचा स्थाई वास सुद्धा राहणार आहे. मित्रांनो मंत्र अगदी लक्षपूर्वक ऐका. “ओम रिम श्रीम लक्ष्मी भयो नमः” “ओम रिम श्रीम लक्ष्मी भयो नमः” तर अशाप्रकारे हा माता लक्ष्मी चा बीज मंत्र 108 वेळा उच्चारायचा आहे.
या मंत्राचा 108 वेळा उच्चारण केल्याने आपल्या जीवनातील अनेक पापे नष्ट होतात. धन येण्याचा मार्गातील ज्या समस्या आहेत त्या नष्ट होतात व ग्रह दोष दूर होतात. आपल्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर त्यांचेसुद्धा निवारण केले जाईल आणि अत्यंत पावन आणि प्रसिद्ध अशा प्रकारचा हा मंत्र आपल्या जीवनातून धनाच्या समस्या कायमस्वरूपी घालवून देतो.
तर कोणत्याही अमावसेला आपण हा उपाय नक्की करा. जर आपणास या उपायाने फरक पडला नाही तर मित्रांनो प्रत्येक अमावस्येला हा उपाय आपण पुनरावृत्त करू शकता. असा हा उपाय आपल्या जीवनातील सर्व धनाच्या समस्या दूर करो आणि आपल्या जीवनामध्ये धनाचा, पैशांचा लाभ होवो हीच मनोकामना.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.