पैशाबद्दल सांगितलेले पाच नियम ! या नियमांचे पालन तुम्ही केले तर आयुष्यात तुम्हाला पैसे कमी पडणार नाही ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” माणसाने जास्त प्रामाणिक असू नये. कारण जंगलामध्ये सर्वात आधी जी सरळ झाडे असतात तीच कापली जातात. असे अनेक शक्तिशाली विचार मांडणारे आर्य चाणक्य हे सर्वात बुद्धिमान व्यक्तींपैकी एक होऊन गेले आहे. असे म्हणतात जे चाणक्यांचे विचार आपल्या आयुष्यात अमलात आणतात त्यांचे आयुष्य सर्वांगाने सुखी आणि आनंदी होते.

आज तुम्हाला मी पैशाबद्दल सांगितलेले पाच नियम सांगणार आहे. त्याचे पालन तुम्ही केले तर, आयुष्यात तुम्हाला पैसे कमी पडणार नाही. सर्वच नियम जबरदस्त आहे पण माझे आवडते शेवटचे दोन आहे. चला तर मग सुरू करूयात.

पहिला नियम:– कोणतेही काम चालू करायच्या आधी नियोजन करा. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे पाच मिनिटे कामाचे नियोजन तुमचा एक तास वाचवतो. याच्यावरून नियोजनाला किती महत्त्व आहे हे तुम्हाला समजले असेल. लोक साधा पैशांचा हिशोब ठेवत नाही मग पैशांचे नियोजन लांबच राहिले.

चाणक्य म्हणतात तुमच्या कोणत्याही कामाचे योग्य नियोजन तुम्हाला नेहमी चांगला परिणाम देते. कारण ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची स्पष्टता असते तेव्हा तुम्ही निर्भय असतात. तुमचे मन शांत असते. तुम्ही कधी विचार केलाय पुढच्या पाच वर्षात, दहा वर्षांत, वीस वर्षात तुमच्याकडे किती पैसे असतील.

तुमच्या मुलांच्या शिक्षणाला किती पैसे लागणार आहे त्याची नियोजन तुम्ही केला आहे का? रिटायरमेंट नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे लागतील याची नियोजन तुम्ही केला आहे का? अशा अनेक गोष्टींचे नियोजन तुम्ही केलं नसेल तर तुम्ही श्रीमंत होण्याची कशी अपेक्षा करता. त्यामुळे भविष्यकाळात पैसे कमी पडू द्यायचे नसेल तर आजपासूनच पैशाचे नियोजन करायला सुरुवात करा.

दुसरा नियम:– पैशांचा नेहमी आदर करा. चाणक्य म्हणतात पैशाला आपल्या खास मित्राप्रमाणे समजा त्याचा नेहमी आदर करा. म्हणजे काय पैशाबद्दल वाईट विचार मनात ठेवू नका. जसे की पैसे सर्व दुःखाचे मूळ आहे, पैसे हाताचा मळ आहे, पैशामुळे माणूस लोभी होतो.

असे विचार तुम्हाला पैशांपासून दूर नेतात. त्यामुळे तुमच्याकडे जे काही धन आहे त्याचे रक्षण करा वायफळ खर्च करून त्याची नासाडी करू नका. कारण आज जर तुम्ही पैसे वाचवाल तर उद्या तोच पैसा तुम्हाला वाचवेल. पैशांची अशा ठिकाणी गुंतवणूक करा जेणेकरून त्यांची नेहमी वाढ होईल.

तिसरा नियम:– घर नेहमी स्वच्छ ठेवा. घराचे वातावरण प्रसन्न ठेवा. चाणक्य म्हणतात तुमचे घर नेहमी स्वच्छ, नीटनेटके ठेवा. घरातले वातावरण नेहमी प्रसन्न आणि शांत ठेवा. जे घर अस्वच्छ आहे, ज्या घरात नेहमी भांडणे होतात, ज्या घरात नेहमी ताण तणावाचे वातावरण असते, त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही.

त्यामुळे घरामध्ये एकमेकांबरोबर प्रेम पूर्ण व्यवहार ठेवा, आई-वडिलांचा आदर करा, मुलांवर चांगले संस्कार करा, अशा घरावर माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायम असतो.

चौथा नियम:-दानधर्म करा निसर्गाचा नियम आहे. जे आपण देतो ते अनेक पटीने आपल्याकडे परत येते. शास्त्रामध्ये दान धर्माला विशेष महत्व दिले गेले आहे. आजच्या काळात लोक इतके स्वार्थी झाली आहे की गरजूंना देणे हे आपले कर्तव्य आहे हेच लोक आज विसरून गेले आहेत. क्षमता असून सुद्धा जी लोक दानधर्म करत नाही, अशा लोकांवर लक्ष्मी नाराज होते.

पुढे चाणक्य म्हणतात दिखाव्यापोटी दान-धर्म करू नका, कारण दिखावा करण्याच्या नादात तुम्ही कंगाल व्हायची शक्यता असते. ज्या प्रकारे अतिसुंदरतेमुळे सीतेचे अपहरण झाले होते, अति घमंडीपणामुळे रावण मारला गेला होता, आणि अति दानशूरता दाखवल्यामुळे बाली असे दाखवल्यामुळे बाली भुईसपाट झाला होता, त्यामुळे दानधर्म नेहमी आपल्या ऐपतीनुसार आणि गरजूंना करा.

पाचवा नियम:– पैसे नेहमी कष्टाने आणि प्रामाणिकपणे कमवा. मला वाटतं की हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. चाणक्य म्हणतात चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही, आणि तो आला तरी अनेक समस्या संकटे बरोबर घेऊन येतो.

लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात आणि त्यांच्या घरात वेगवेगळे प्रॉब्लेम सोडायला सुरवात होते त्यांना कळतच नाही त्यांच्या घरातील वेगवेगळे प्रॉब्लेम चे कारण त्यांचे चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे आहेत चुकीच्या मार्गाने मिळवलेला पैसा आयुष्य बरबाद करतो हे अटळ सत्य आहे. पैसे भरपूर कमवा पण ते प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमावलेली असली पाहिजे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *