आज आपण पाहणार आहोत जेवणा नंतर ओवा खाण्याचे आरोग्यावर होणारे 20 फायदे. आपण जर आपल्या रोजच्या जीवनात ओव्याचे सेवन करत नसाल तर आवर्जून हा लेख वाचा.
ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात, त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.
1.पचन सुधारते-ओवा खाल्यामुळे शरीरावर अनेक चांगले फायदे होतात त्यातील सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे पचनक्रिया सुधारते याचे कारण म्हणजे ओव्या मध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकामध्ये ओव्याचा वापर आवश्य करावा.
2. पचनक्रिया– जेवणानंतर ओव्यांचा मुखवास खाण्याने पचनक्रियेमध्ये हळूहळू सुधार होतो. अतिप्रमाणात जेवण झाल्यास किंवा अपथ्यकारक पदार्थ खाल्याने देखील अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅसेस होतात जेणेकरून अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादि गोळी घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्याने पोट दुखीवर त्वरित आराम मिळतो. कारण ओव्याने पोटातील गॅस लगेच कमी होण्यास सुरुवात होते.
3.सर्दी– वातावरणातील बदलाचा आपल्या शरीरावर खूपच परिणाम होत असतो. सर्दी-खोकला अशा आरोग्याच्या समस्या वारंवार होत असतील तर त्यावर ओवा अत्यंत फायदेशीर आहे.
सर्दी खोकला झाल्यास तसेच कफ कमी करण्यासाठी ओव्याची धुरी घ्यावी किंवा ओवा तव्यावर गरम करून कपड्याच्या पुरचुंडीने त्याचा शेक छातीला द्यावा. या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल नाक मोकळे होण्यासाठी या पूरचुंडीचा वास घ्यावा त्यामुळे चोंदलेले नाक लवकरच मोकळे होईल.
4. पित्त – पित्ताचा त्रास होत असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी अत्यंत हितकारक आहे. पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी ओवा सैंधव मीठ आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्यावी त्यामुळे लवकरच आराम मिळेल.
5. सांधेदुखी– सांधेदुखीचा त्रास होत असेल तर ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास लवकर आराम मिळतो.
6.वजन कमी करण्यासाठी– वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी घ्यावे कारण ओव्याच्या पाण्याने चयापचय शक्ती वाढते. त्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गळून रिकाम्यापोटी प्यावे. या पाण्याने चरबी कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.
7.कान दुखी– कान दुखत असेल तर ओव्याचे तेलाचे काही थेंब कानात घालावेत. त्यामुळे कान ठणकने कमी होते.
8.दात दुखी– दातातील इन्फेक्शनमुळे दात दुखणे किंवा हिरड्या सुजण्याची समस्या निर्माण होते. दात दुखत असल्यास होणाऱ्या वेदना इतर कोणत्याही वेदनेपेक्षा अधिक असतात. त्यामुळे त्यावेळी ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्यास लवकर आराम मिळतो. दात दुखत असेल तर ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातावर लावले किंवा दातांच्या हिरडीला ओव्याच्या तेलाने मसाज करावा. तुम्हाला लवकरच आराम मिळेल मिळेल.
9.बद्धकोष्ठता– तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दररोज दुपारी जेवल्यावर एक ग्लास ताकामध्ये ओव्याची पूड आणि सैंधव मीठ टाकून प्यावे. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.
10.दमा-दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळाचा वापर करून दिवसातून दोन वेळा ओवा खावा.
11.तोंडाची दुर्गंधी-आधी सांगितल्याप्रमाणे दातदुखीवर उपयुक्त आहेत पण तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतावत असेल तर पाण्यामध्ये लवंग तेल आणि ओव्याचे तेल टाकून गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास खूप मदत होते.
12.मासिक पाळीच्या समस्या– मासिक पाळी मध्ये अनेक जणांना पोट दुखी आणि कंबर दुखी सहन करावी लागते आशा वेळी ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.
13.जुलाब-जुलाब होत असतील तर दिवसातून 2 वेळा ओव्याचे पाणी प्यावे. जुळबाच्या त्रासावर ओवा खूपच फायदेशीर आहे.
14.ताप-जर तापआला असेल तर ओवा आणि दालचिनीचा काढा प्यावा यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास खूप मदत होते.
15. मूळव्याध-मूळव्याधीच्या त्रासामध्ये जर रक्त पडण्याचा त्रास होत असेल तर त्या पासून आराम मिळण्यासाठी ओवा हा खूपच फायदेशीर आहे यासाठी नियमितपणे ताकातून जिरे पावडर आणि ओव्याची पावडर घालून ताक प्यावे.
16. मायग्रेन-ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने किंवा ओव्यांचा लेप डोक्यावर लावल्याने मायग्रेन चा त्रासापासून आराम मिळतो हा मायग्रेन वरील घरगुती आणि अत्यंत गुणकारी असा उपाय आहे.
18.पांढरे केस-केस काळे करण्यासाठी देखील ओव्यांचा वापर होतो यासाठी 2, ते 3 कडीपत्ता ची पाने 2 मनुका एक चिमूट ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास हे पाणी दररोज प्या हळूहळू केस काळे होतील.
19.जंत-ओवा आणि सैंधव मीठ एकत्र घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो वाताचा त्रास असलेल्या लोकांनी हातावर आणि पायावर ओव्याच्या तेलाने मालिश करावी नियमितपणे या त्याने मालिश केल्यास वात समस्या हळूहळू कमी होती.
20.श्वसन समस्या-ओव्यातील थायमोल मुले श्वसनाच्या समस्या देखील कमी होतात त्यासाठी ओवा दररोज चावून चावून खावा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी ओवा खाल्यावर त्यावर कोमट पाणी जरूर प्यावे असे दररोज केल्यामुळे दम लागण्याचा त्रास हळूहळू कमी होतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.