सेंद्रिय शेतीमुळे शेती व्यवसायात भविष्यात खूप संधी..या प्रकारे करा नियोजन.

प्रादेशिक

सध्या लोकांमध्ये आहाराविषयी जागरूकता निर्माण होत आहे. रासायनिक खते, विषारी कीटकनाशके वापरून पिकवलेले फळे, भाजीपाला, व इतर धान्य हे शरीराला किती घातक आहे या विषयी लोक जागरूक होत आहे.

हीच संधी ओळखून बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळायला सुरुवात केली आहे, यातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत आहे.सेंद्रिय शेती मध्ये रासायनिक खते, विषारी कीटकनाशके न वापरता सेंद्रिय खते, तसेच केमिकल विरहित मिश्रणे वापरली जातात. भविष्यातील मोठी गुंतवणूक म्हणून बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

विदेशामध्ये सेंद्रिय शेतीचे फायदे ओळखून याआधीच तेथील शेतकरी आणि खते, कीटकनाशके बनवणाऱ्या कंपन्या सेंद्रिय शेतीकडे तसेच सेंद्रिय उत्पादन निर्मितीकडे वळले आहे. शहरी भागांमध्ये सध्या सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत आहे.

शेतकरी एकत्र येऊन हा उपक्रम राबवू शकतात. गटशेतीच्या माध्यमातून उत्पन्न घेतले तर ते उत्तम राहील, सौदी अरेबिया, युरोप या सारख्या ठिकाणांहून एकत्र मोठ्या ऑर्डर उपलब्ध होत असतात, शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचाही विचार करावा, जेणेकरून व्यापारी वर्गावर विक्रीसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सेंद्रिय शेतमालाचा भाव हा नेहमीच रासायनिक मालापेक्षा जास्त असतो. त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात मागणीचा विचार करून योग्य मार्गदर्शनाखाली शेतकरी उत्पादक कंपनी सुरु करून सेंद्रिय शेतीचे उत्पादन घ्यायला हरकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *