लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारा || मार्केट मध्ये नेहमी मागणी असलेला || नूडल्स व्यवसाय कसा सुरु करावा याची सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती || संबंधित लायसन्स || मशीन्स इत्यादी.

उधोगविश्व

नूडल्स हे असे स्नॅक्स आहे जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते, हा अगदी कमी वेळात तयार होणार पदार्थ आहे आणि लोक मोठ्या आवडीने खातात. त्याची चव आणि आवडीमुळे, नूडल्स ची मागणी बाजारात खूप जास्त आहे, म्हणून जर कोणाला अल्प गुंतवणूकीने व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही नूडल्स बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता आणि बाजारात आपल्या ब्रँडसह नूडल्स विकू शकता. या आर्टिकल मध्ये, आपण नूडल्स बनवण्याच्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नूडल्स मेकिंग बिझिनेस मार्केट स्कोप:- आज काल बाजारात नूडल्सला बरीच मागणी आहे कारण ते खूप लवकर तयार होते आणि नाश्ता आणि सायंकाळ स्नॅक्स म्हणून नूडल्स खाणे पसंद करतात. सध्या मार्केट मध्ये जे नूडल्स उपलब्ध आहे ते मोजकेच ब्रँड आहे, आपल्या देशाचा जर विचार केला तर शेकडो प्रकारचे मसाले, विविध चवीनुसार उपलब्ध आहे. आपण या गोष्टीकडे संधी म्हणून बघू शकता, विविध मसाले वापरून आपण आपला नूडल ब्रँड लोकप्रिय करू शकता. हा कायम चालणारा व्यवसाय आहे.

नूडल्स बिजनेस Requirements:- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बर्‍याच गोष्टी आवश्यक आहेत, परंतु त्या गोष्टीची आवश्यकता व्यवसायाच्या आकारावर अवलंबून असते, कारण घरातून व्यवसाय सुरू केल्यास अधिक गोष्टी आवश्यक नसतात आणि जर व्यवसाय मोठ्या पातळीवर सुरू करायचा असेल तर बर्‍याच गोष्टीची आवश्यकता असते. जसे कि गुंतवणूक, जमीन, व्यवसाय योजना, बिल्डिंग, मशीन, वीज, पाण्याची सोय, कर्मचारी, कच्चा माल, वाहन. या सगळ्यानबद्दल आता खाली सविस्तर जाणून घेऊया.

नूडल्स मेकिंगसाठी गुंतवणूक: – यामध्ये गुंतवणूक व्यवसायावर अवलंबून असते कारण जर तुम्ही एखादा मोठा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागेल आणि जर तुम्ही छोटा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही तुमच्या स्वत: च्या जमिनीत व्यवसाय सुरू केला तर बरीच गुंतवणूक वाचेल. आणि जर तुम्ही जमीन भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागेल.

यानंतर, हा व्यवसाय चांगल्या स्तरावर सुरू करण्यासाठी मशीन खरेदी करावी लागेल, बिल्डिंग किंवा शेड बांधावे लागेल, ज्यामध्ये मशीन ठेवली जाईल आणि सर्व स्टॉक ठेवण्यासाठी स्टोर रूम, त्यानंतर वीज, पाणी सुविधा, कच्चा माल, वाहने, या प्रत्येकासाठी वेग वेगळी गुंतवणूक करावी लागते जसे कि; जमीन = सुमारे रु. 5 लाख ते रू. 10 लाख (जर जमीन आपल्या मालकीची असेल तर त्यासाठी पैसे खर्च होणार नाहीत), बिल्डिंग = सुमारे रु. 2.5 लाख ते 3 लाख (भाड्यानेदेखील घेऊ शकता ), मशीन = सुमारे रु. 35,000 ते रू. 5 लाख, कच्च्या मालाची किंमत = सुमारे रू. 20,000 ते रू. 50,000, इतर खर्च = सुमारे रू. 1 लाख ते रू. 1.5 लाख, एकूण गुंतवणूक: – सुमारे रु. 2 लाख ते रू. 3 लाख (जर घरामधून सुरुवात केली तर त्यासाठी इतका पैसा खर्च होणार नाही).

नूडल्स बनवण्याच्या व्यवसायासाठी चांगली जमीन असणे आवश्यक आहे, कारण त्यामध्ये प्लांट तयार करावे लागतात, त्यानंतर गोडाऊन बनवावे लागते आणि काही जमीन पार्किंगसाठी आवश्यक आहे. प्लांट:- 500 चौरस फूट ते 700 चौरस फूट, गोडाऊन:- 500 चौरस फूट ते 1000 चौरस फूट, इतर जागाः – 200 चौरस फूट ते 500 चौरस फूट, एकूण जागा: – 2000 चौरस फूट ते 2500 चौरस फूट.

नूडल्स उत्पादनाच्या व्यवसायासाठी कच्चा माल: – या व्यवसायात अधिक कच्च्या मालाची आवश्यकता नाही, काही साहित्य आवश्यक आहे जसे की; मैदा / पीठ, मीठ, एरोरूट पावडर, सोडियम बायकार्बोनेट, रंग. नूडल्स बनवण्याच्या व्यवसायासाठी कच्चा माल घेण्याचे ठिकाण/ नूडल्स तयार करण्यासाठी कच्चा माल कोठे खरेदी करायचा:- नूडल्स बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू कोणत्याही होलसेल बाजारातून खरेदी करू शकता, परंतु तुम्हाला ही सामग्री ऑनलाईन खरेदी करायची असेल तर dir.indiamart.com. या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता.

नूडल्स बनविण्यासाठी मशीन्स: – नूडल्स बनविण्यासाठी जास्त मशीनची आवश्यकता नसते, एक मशीन नूडल्स बनवण्यासाठी आणि दुसरे पॅकिंगसाठी परंतु जर व्यवसाय लहान स्तरावर सुरू केला तर पॅकिंग हाताने पण करू शकतो आणि नूडल्स बनविणार्‍या मशीनमध्ये अनेक प्रकारचे डाई वापरले जाऊ शकतात ज्यामध्ये जाड पातळ नूडल्सनुसार डाई बदलू शकतो. नूडल्स ची मशीन तुम्ही dir.indiamart.com/impcat/noodle-machine.html हि site google वर कॉपी करून मशीन खरेदी करू शकता. नूडल्स बनविणार्‍या मशीनची किंमत किमान 35,000 रुपयांपासून सुरू होते.

नूडल्स व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे: कोणताही व्यवसाय सुरू करतांना काही वैयक्तिक कागदपत्रे आवश्यक असतात आणि काही व्यवसायाशी संबंधित लायसन्स आवश्यक असतात जसे की; वैयक्तिक दस्तऐवजात अशी अनेक कागदपत्रे असतात: आयडी पुरावा: – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, ऍड्रेस पुरावा: – रेशन कार्ड, वीज बिल, पासबुक सह बँक खाते, फोटोग्राफ ईमेल आयडी, फोन नंबर, इतर कागदपत्रे.

व्यवसाय कागदपत्रे: – व्यवसाय दस्तऐवजात अशी अनेक कागदपत्रे आहेतः व्यवसाय नोंदणी, स्थानिक नगरपालिका संस्था प्राधिकरण, MSME उद्योग आधार नोंदणी, FSSAI परवाना BIS प्रमाणपत्र. जर तुम्हाला नूडल्स बनवविण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर यासाठी क्षेत्रफळ विश्लेषण, जमीन निवड, प्रकल्प योजना, नोंदणी, आर्थिक व्यवस्था इत्यादी बरीच कामे करावी लागतील हि सर्व कामे एका प्रक्रियेनुसार करावी लागतात.

Area Analysis (क्षेत्र विश्लेषण): – जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम त्या क्षेत्राचे विश्लेषण करणे गरजेचे आहे, Area Analysis त्या Area मध्ये रिसर्च केले जाते जिथे व्यवसाय करण्याचा विचार करीत आहात तिथे सर्वच माहिती करून घेतले जाते. त्यानंतर तिथे आधीपासून किती प्लांट आहेत, ते कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात, त्यांच्या प्रोडक्टची किंमत किती आहे, तुम्ही त्यापेक्षा कमी किंमतमध्ये देऊ शकता का? आणि ग्राहकांची मागणी काय आहे ते शोधून काढा.

Land Selection (जमीन निवड): – Area Analysis (क्षेत्र विश्लेषण) केल्यानंतर लोकेशन सिलेक्ट करावे लागते आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या जागेवर चांगली रस्त्याची सुविधा, पाण्याची सोय, वीज सुविधा असणे आवश्यक आहे. आणि चांगली जमीन असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे अशा लोकेशन वर स्वतःची जमीन असेल तर खूपच चांगले आहे, परंतु तुमच्याकडे अशी जमीन नसेल, तर आधी जमीन बघा जिथे जमीन स्वस्त उपलब्ध आहे आणि त्या लोकेशन जवळ सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Project Plan (बिज़नेस प्लान):- जेव्हा लोकेशन सिलेक्ट होईल त्यानंतर बिजनेस प्लॅन रेडी करा जसे कि किती इन्व्हेस्ट करावे लागेल, कोण कोणती मशीन आणावी लागेल, अशा सर्व गोष्टी व्यवसायाच्या योजनेत समाविष्ट केल्या पाहिजेत. Financial Arrangement (आर्थिक व्यवस्था): – एकदा बिजनेस प्लॅन रेडी झाला की त्यानंतर आर्थिक व्यवस्था करावी लागते कारण गुंतवणूकीशिवाय काहीही करता येणार नाही.

लायसन आणि रजिस्ट्रेशन: – जेव्हा गुंतवणूक केली जाते, त्यानंतर लायसन्ससाठी अर्ज करा कारण नूडल्ससाठी रजिस्ट्रेशन आणि लायसन अत्यंत आवश्यक आहे, तुम्ही त्याशिवाय व्यवसाय करू शकत नाही. मशीन खरेदी: – व्यवसायासाठी लायसन मिळाल्यानंतर व्यवसायासाठी मशीन खरेदी करा.

इलेक्ट्रिसिटी फिटींग आणि मशीन इंस्टॉलेशन: – मशीन घेतल्यानंतर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिसिटी फिटींग करा आणि मग मशीन बसवा. सर्व गोष्टी केल्यावर, तुमच्या व्यवसायानुसार तुम्ही एक दोन कामगार ठेऊ शकता, त्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

नूडल्स मेकिंग बिझिनेस मार्केटिंग:- आजकाल कोणतेही प्रॉडक्ट विकायचे असेल तर त्याचे मार्केटींग महत्वाचे आहे कारण जर ग्राहकाला त्या उत्पादनाविषयी माहिती नसेल तर ग्राहक ते प्रॉडक्ट कसे खरेदी करेल, म्हणून कोणताही व्यवसाय असो मार्केटिंग गरजेचे आहे आणि नूडल्ससाठी मोठ्या किराणा दुकानांशी संपर्क ठेवणे महत्वाचे आहे. कारण या दुकानांमधून छोटी छोटी दुकाने हे प्रॉडक्ट खरेदी करतात, म्हणून मोठ्या/होलसेलर किराणा दुकानांशी संपर्क साधा किंवा तुम्ही हॉटेल मध्ये पण कॉन्ट्रॅक्ट करून तुमचे प्रॉडक्ट विकू शकतात.

नूडल्स व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज:- जर तुम्ही नूडल्स मेकिंग व्यवसाय घरातून सुरू करत असेल तर कर्जाची आवश्यकता नाही परंतु जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर केला तर तुम्ही यासाठी कर्ज घेऊ शकता, भारत सरकारच्या वतीने लोकांना व्यापार करण्यासाठी. “मुद्रा लोन” दिले जात आहे ज्यात तुम्ही नूडल्सचा व्यवसाय करण्यासाठी मुद्रा लोन देखील घेऊ शकता, यासाठी तुम्हाला त्यांच्या कार्यालयात किंवा बँकेत जावे लागेल आणि तुमच्या बिजनेस डिटेल्स द्यावा लागेल, नूडल्स व्यवसायात कोणत्या गोष्टी आहेत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी आणि त्या वस्तू खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतील याची माहिती द्यावी लागेल, त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सादर करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *