नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपले केस काळेभोर असावेत, आपली स्किन तजेलदार असावी, यावरती सुरकुत्या नसाव्यात, असं जर तुम्हाला वाटत असेल, नेहमी आपण तरुण राहावं, म्हातारपण आपल्यामध्ये येऊच नये, अशी जर तुमची इच्छा असेल, तर एक सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे. जसा ज्याचा आहार तसं त्याचं तारुण्य.
अगदी बरोबर तुम्ही वाचताय. जर तुमचा आहार योग्य असेल तर तुम्ही सतत चिरतरुण राहणार. आज आम्ही आयुर्वेदाने सांगितलेले असे तीन पदार्थ आपल्याला सांगणार आहोत, की हे तीन पदार्थ जर तुम्ही दररोज खाल्लेत उन्हाळा, पावसाळा, किंवा हिवाळा असो.
हे पदार्थ तीन पदार्थ जर तुम्ही प्रमाणामध्ये दररोज जर खाल्ले तर तुम्ही सदासर्वकाळ तरुण रहाल. तुमच्या चेहऱ्यावर ती सुरकुत्या पडणार नाहीत आणि तुमची त्वचा ही तजेलदार राहील तुम्ही तरूण दिसाल. हे जे तीन पदार्थ आहेत त्यातील पहिला पदार्थ आपण पाहूया तो म्हणजे “लिंबू“.
लिंबू दिसायला अगदी साधा आहे, पण विटामिन सी चा सर्वात मोठा स्रोत आहे लिंबू. आपल्या ज्या डॅमेज झालेल्या सेल्स असतात, त्या सेल्स ला रिपेअर करण्याचे काम करते लिंबू. यामध्ये लोह ॲबजॉब करण्याची मोठी पावर असते. म्हणजेच आपल्या रक्तामध्ये लोह शोषून घेण्यासाठी लिंबू फार मदत करतात.
त्याच प्रकारे हे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा खूप चांगलं बनवत.म्हणजे रक्ताभिसरण चांगलं करत, आणि रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे जी पोषकद्रव्य असतात ती प्रत्येक पेशीपर्यंत अगदी सहज पोहोचता, आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती त्वचेवर काळे डाग पडत नाहीत.
आणि पडलेले असतील तर ते कमी होता. सुरकुत्या पडत नाहीत. आणि त्वचा नेहमी ताजीतवानी आणि जवान दिसते. आपण लिंबाच सेवन लिंबू पाण्यामध्ये सुद्धा करू शकता. लिंबू पाणी घेतल्याने मेट्याबोलीसम ची प्रक्रिया फास्ट बनते आणि परिणामी आपल्याला आपल्या आहारामध्ये आपण जे काही खाऊ त्याचे पचन चांगल्या प्रकारे होतात.
तर लिंबू हा आपण नक्की दररोज आपल्या आहारात समावेश करायला हवा. साधारणतः एका कुटुंबात जर चार व्यक्ती असतील तर एक ते दोन लिंबू त्यांनी दिवसाला वापरायला हवेत. दुसरा पदार्थ आहे “अक्रोड“. ड्रायफ्रूटस असतात त्यापैकी एक पदार्थ आहे अक्रोड. अक्रोड मध्ये ओमेगा-3, ओमेगा 6 फॅटी ऍसिडस असतात.
विटामिन सी चा मोठा स्रोत आहे अक्रोड. यामध्ये प्रोटिन्स असतात. आणि झिंक च प्रमाण देखील बर्यापैकी आहे. आणि हे सगळे घटक यामध्ये आहेत त्यामुळेच अक्रोडचे महत्त्व इतके वाढले की तुमची त्वचा केस यांचा संरक्षण यामुळे होतं. तुमच्या पेशींना ऊर्जा पोचविण्याचे काम अक्रोड करत.
तसंच सूर्य सूर्यापासून जी अल्ट्रा व्हॉयलेट किरणं आपल्यापर्यंत येतात या अल्ट्रावायलेट घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण सुद्धा हे अक्रोड करत. नवनवीन पेशींची निर्मिती करण्यासाठी अक्रोड खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरात ज्या पेशी असतात, या पेशी कालांतराने नष्ट होत असतात.
आणि त्या जागी नवीन पेशी निर्माण होत असतात. पण ज्यावेळी नवीन पेशी निर्मितीचा वेग कमी होतो, त्यावेळी आपण म्हातारे दिसू लागतो. तर हा वेग वाढविण्याच काम अक्रोड करतात. आपण जर दररोज दोन ते तीन अक्रोड रेगुलारली खायला हवेत त्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळेल.
ते दाट बनतील घनदाट बनतील, काळेभोर बनतील तसेच आपली त्वचा सुद्धा मुलायम बनेल आणि आपली हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा हे अक्रोड खूप चांगलं आहे. तिसरा पदार्थ जे आयुर्वेद सांगतं तो पदार्थ आहे “रताळी” तर ही रताळी बीट केरोटीन युक्त असतात.
त्यामुळे आपल्या केसांना त्वचेला आणि नखांना पोषण देण्याचं काम ही रताळी करत असतात. बीटा कॅरोटीन बरोबरच याच्यामध्ये फटी ऍसिडस्,ओमेगा-3, विटामिन ए,बी,सी,डी,इ आणि के अशी जवळजवळ सर्व प्रकारची विटामिन्स या रातळ्यांमध्ये आपल्याला दिसून येतात.
आणि म्हणून हा पदार्थ सुद्धा अतिशय चांगला आहे. तुमच्या पेशींची वाढ करण्यासाठी. यामध्ये खूप चांगला घटक आहे तो म्हणजे अँटिऑक्सिडंट.आपल्या शरीरामध्ये फ्री रेडिकलस ची सतत निर्मिती होत असते आणि आपलं शरीर म्हातारं करण्यास कारणीभूत घटक कोणता असेल तर तो म्हणजे फ्री रॅडिकल्स.
तरी फ्री रॅडिकल्स रोखण्याचे काम त्यांना नष्ट करण्याचे काम अँटिऑक्सिडंट करतात. आणि हे अँटिऑक्सिडंट आपल्याला रताळ्या पासून मिळतात.आणि म्हणून रताळी आपण रोज खाल्ली पाहिजे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.