नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” अस म्हणतात की नवरा बायकोचे नाते हे खूप पवित्र नात आहे. जेव्हा दोन व्यक्ती लग्न करतात, तेव्हा त्यांची फक्त शरीर वेगळे असतात आणि आत्मा एक होतो. पण आज धावपळीच्या जगात ह्या सगळ्या गोष्टी पुराणातील वांगी म्हणून राहिले आहेत.आज स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चालली आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे.
आज नवराबायको दोघे पण नोकरी करत असल्यामुळे दोघेपण स्वावलंबी झाले आहे.एका बाजूला या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना नवरा बायको मध्ये असलेले प्रेम हे कुठेतरी मेकॅनिकल होत चालले आहे.आजचे प्रेम फक्त फेसबुक आणि व्हॉटसअपवर लोकांना दाखवण्यासाठी चांगले फोटो काढायचे एवढ्यापुरते मर्यादित झाली आहे.
पण पडद्यामागचे वास्तव वेगळेच असते.आज घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे कारण एकमेकांबद्दलची आपुलकी,प्रेम आदर कमी होत चालला आहे.तसे पाहायला गेले तर कारणे खूप आहेत. चार मुख्य कारणे त्याच्यामुळे आज नवरा-बायकोमध्ये जास्त दुरावा निर्माण होत आहे.
1. सर्वात पहिले कारण म्हणजे अपेक्षांचा भडीमार – आज छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायको मध्ये भांडण होतात याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एकमेकांकडून ठेवलेल्या अनावश्यक अपेक्षा.त्याने मला फोनच केला नाही, त्याने माझ्या मेसेज चा रिप्लाय दिला नाही,तो वेळेवर घरीच येत नाही.
तो मला बाहेर कुठे फिरायला घेऊन जात नाही, तो कधी नवीन ड्रेस किंवा साडी घेऊन येत नाही,किंवा तिने सकाळी सात वाजताच उठले पाहिजे, तिने हाच ड्रेस घातला पाहिजे, तिने मला जेवण वेळेवर दिले पाहिजे,दरवेळेस तिनेच मला फोन केला पाहिजे.या असल्या प्रकारच्या अनावश्यक अपेक्षा आपण ठेवल्या तर आपला संसार कसा सुखी होईल ?
आता तुम्ही म्हणाल आपल्याच माणसाकडून अपेक्षा ठेवणार? बरोबर आहे.अपेक्षा ठेवा पण आग्रह धरू नका. त्या पूर्ण झाल्या पाहिजे.जिथे आग्रह निर्माण होतो तिथे वादाला सुरुवात होते. त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्या.इथे नवऱ्याने आणि बायकोने आत्मपरीक्षण केले पाहिजे. की आपण अनावश्याक अपेक्षा तर ठेवत नाही ना?
2. दुसरे कारण तुझीच चूक आहे आणि माझे बरोबर आहे. – जेव्हा नवरा बायको प्रत्येक वेळेस दोघेपण हा दृष्टिकोन ठेवून, की नेहमी माझेच बरोबर आहे तुझे चूकीचे आहे.तेव्हा कसा निर्णय होईल पण आज दोघांचे पण अहंकार एवढे मोठे झाले आहे हे कोणीच माघार घ्यायला तयार नसते.
हे लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे एकमेकांना माफ करायला शिकले पाहिजे. समोरचा माणूस आहे ना देव नाही, तो चुका करणाराच त्या, चुका पोटात घातल्या पाहिजे. एकमेकांचे दुर्गुण स्वीकार करता आले पाहिजे.
मला माहिती आहे या गोष्टी बोलायला सोपे आहे पण करायला अवघड, पण आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगायचे असेल तर ते करावंच लागेल नाहीतर आयुष्यात कधी निघून जाईल समजणार पण नाही, त्यामुळे नवरा-बायकोमध्ये प्रेम टिकवायचे असेल तर दोघांनी तडजोड करायला शिकले पाहिजे.
3.तिसरे कारण म्हणजे एकमेकांची काळजी न घेणे. – अनेक वेळा असे होते की, आपण एकत्र राहत असताना आपण एकमेकांची काळजी घेत नाही. असे वाटते म्हणून घरातच आहे ना त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी काय करायचे आहे, आता जे हवे ते मिळाले आहे,त्याला खुश करून काय होणार आहे.
हे कुठे घरा बाहेर जाणार आहे,आपल्याकडेच राहणार आहे पण असं नाही. तो तुमचा जीवनसाथी आहे. तो तुमच्याबरोबर आयुष्य काढणार आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्या तब्येतीची, त्याची इच्छा आकांक्षा ची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे.
नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये जेव्हा एकमेकांबद्दल काळजी नसते तेव्हा तिथे एकमेकांबद्दल आदर राहत नाही आणि मग भांडणे चालू होतात, कारण दोघांचे म्हणणे असते तो माझ्यासाठी काहीच करत नाही, तेव्हा मी कशाला काय करू? त्यामुळे ही भांडणे कधीच संपत नाही.
त्यामुळे तुमच्या जोडीदाराला गृहीत धरायचे अजिबात करू नका.जसे तुम्ही स्वतःच्या चुकाला महत्व देता, स्वतः च्या इच्छाना महत्त्व देता तेवढेच महत्त्व तुम्हाला जोडीदाराच्या सुखाला सुद्धा देता आले पाहिजे.
4.चौथे कारण हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि आज काल खूप वाढत चालले आहे- . ते म्हणजे एकमेकांच्या विश्वासघात करणे. ते मग कोणत्याही मार्गाने असू दे. खोटे बोलून असू दे किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवणे असुदे. जेवण नवरा-बायकोमध्ये विश्वास घात येतो तेव्हा ते नाते असत, नसणे यात काही फरक नसतो.
विश्वास घात हे एक प्रकारचे विष आहे जे नवरा-बायकोच्या पवित्र नात्याला मारून टाकते,त्याचा आत्माच निघून जातो.जे नवरा-बायको एकमेकांवर विश्वास घात करतात ते फक्त एकमेकांचा विश्वास घात करत नाही ते आपल्या पूर्ण परिवाराचा विश्वासघात करतात.
याने फक्त एकाच आयुष्य बरबाद होत नाही तर मुलांचे आयुष्य बरबाद होते, आई वडिलांचे पण आयुष्य बरबाद होते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांबरोबर कधीच विश्वास घात करू नये.काही गोष्टी खटकत असतील तर मोकळेपणाने बोला. विचार जुळत नसतील तर समजुतीने वेगळे व्हा, कारण ते विश्वास घात करण्यापेक्षा चांगले आहे.
पण विश्वासघात नावाचा साप तुमच्या आयुष्यात येऊन देऊ नका. तुम्हाला खऱ्या अर्थाने सुखी आणि आनंदी व्हायचे असेल तर तुम्हाला वैयक्तिक पारिवारिक व्यवसाय सामाजिक सर्व क्षेत्रांमध्ये बॅलन्स साधता आला पाहिजे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.