नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” मनातील इच्छा पूर्ण व्हावी यासाठी देवाकडे नवस बोलण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. नवस कसा बोलावा, कुठे बोलावा, कधी बोलावा याबाबत मात्र आपल्याला सविस्तर माहिती नसते. तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
नवस बोलल्यामुळे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते अशी अनेकांची श्रद्धा असते. अनेकांच्या बाबतीत हे खरे सुद्धा झालेलं पाहायला मिळत. तर अनेकांचा मात्र यावर विश्वास नसतो. पण नवस बोलणं हा संपूर्णपणे ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे.
तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलायची इच्छा असेल तर तो नवस तुम्ही मंदिरात जाऊन बोलू शकता. तसाच तो घरी सुद्धा बोलू शकता. घरी नवस बोलताना तो आपल्याच देवघरात बसून बोलायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक संपूर्ण नारळ लागेल तो सोलायचा नाही.
जसा आणला असेल तसाच तो नारळ घ्यायचा. तुम्ही स्वतः किंवा ज्यांना नवस बोलायचा आहे त्यांनी देवघरात जायचं, देवघरात बसायचं नंतर देवाला नमस्कार करायचा. देवाजवळ धूप आणि दिप लावायचा आणि जो नारळ तुम्ही आणला आहे तो तुम्ही दोन्ही हातांमध्ये धरायचा.
नंतर डोळे बंद करून तुमच्या मनातली इच्छा देवापुढे व्यक्त करायची आहे. तुमची मनोकामना व्यक्त केल्यानंतर नवस पुर्ण झाल्यावर तुम्ही काय करू शकता हे ही बोलायच आहे. फक्त बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे करणं शक्य असेल तेच बोलावे आणि ज्या गोष्टीमुळे इतर कुणालाही नुकसान होणार नाही अशीच गोष्ट बोलावे.
कारण तुम्ही जे शक्य नाही ते बोललात तर नवस पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण करताना तुम्हाला अडचणी येतील आणि तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकत म्हणूनच ते तुम्हाला करता येणे शक्य आहे तेच बोला. जस की 11 बालकांना किंवा बालिकांना बोलावून जेवायला देणं, गोर गरिबांना दान करणं, किंवा मंदिरात दर्शनासाठी जाणं कुलदेवतेला जाण.
या प्रकारे जे शक्य असेल ते बोलावं आणि तो नारळ देवघरात तसाच ठेवून द्यावा.तो नारळ त्या दिवसापर्यंत ठेवायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जे काही बोलला होता तुमची जी काही इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे तेव्हा तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये, समुद्रात, तलावात विसर्जित करायचा आणि जे तुम्ही नवसासाठी कबूल केलं होतं ते लवकरात लवकर पूर्ण करायच.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.