नशीबवान व्यक्ती कोणत्या दिवशी जन्म घेतात? ।। तुम्हाला माहिती आहे का? ।। चला तर या लेखात जाणून घ्या तुमच्या जन्माबद्दल सविस्तर माहिती !

कला चित्रपट शिक्षण

आज आपण पाहणार आहोत कोणत्या दिवशी जन्मलेली मुले नशीबवान असतात. सुरुवात करूया रविवार पासून

1.रविवार– ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्या व्यक्तींवर सूर्य देवांची कृपा असते. या व्यक्ती सुर्यासमान तेजस्वी असतात. त्या नशीबवान असतात भाग्यशाली असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते. यांचा स्वभाव मुळातच शांत असतो.

आणि या व्यक्ती कुणाच्याही कामांमध्ये कधीच नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामात सुध्दा कोणी नाक खुपसलेलं त्यांना अजिबात आवडत नाही. ज्या व्यक्ती त्यांच्या कामात सतत अडथळा आणतात त्यांचा त्यांना प्रचंड राग येतो.

2.सोमवार– ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो, अत्यंत गोडबोले असतात. खूप गोड बोलतात सतत हसतमुख असतात. चेहरा सतत हसरा असतो. सतत खुश राहतात. कधी या व्यक्ती तुम्हाला नाराज दिसणार नाहीत. मात्र यांचा स्वभाव चंचल असतो आणि स्वभाव चंचल असल्यामुळेच यांना कधीच ठाम निर्णय घेता येत नाहीत.

त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते. मात्र योग्य तो निर्णय त्यांना लवकर घेता येत नाही. ही व्यक्ती आपल्या आई वरती खूप जास्त प्रेम करतात.

3.मंगळवार– ज्या व्यक्तींचा जन्म मंगळवारी होतो, त्यांच्यावरती श्री हनुमानाची कृपा आढळते. हे लोक स्वभावाने खूप चांगले असतात. मात्र स्वभाव आणि चांगले असले तरीसुद्धा हट्टीपणा यांच्यामध्ये खुप असतो. एखादी गोष्ट त्यांना आवडली किंवा त्यांच्या मनामध्ये भरली तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते अगदी काहीही करू शकतात.

मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती ईमानदार असतात. दुसऱ्यांची मदत करतात अगदी कोणत्याही स्वार्था वीणा दुसऱ्यांची मदत करतात. यांना ऐशोआरामाचा जीवन जगणे पसंत असतं. कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसा कमावण्याचा हे लोक विचारही करत नाही. दुसऱ्याप्रति सातत्याने इमानदारी बाळगतात.

4.बुधवार-ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी होतो, त्या व्यक्तींना धार्मिक कार्याची प्रचंड आवड आढळते. हे लोक धार्मिक कार्य देव देव खूप करतात. त्यांची बुद्धी तेजस्वी असते. अत्यंत तेजस्वी बुद्धीचे आणि बुद्धिमान अशा प्रकारचे लोक असतात.

5.गुरुवार -ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो या व्यक्तींच वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या समोर कितीही कठीण परिस्थिती आली तरी सुद्धा त्या कठीण परिस्थितीवर मात कशी करायची हे यांना खूप चांगलं जमतं. कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, त्या प्रसंगातून ते अगदी अलगद बाहेर पडतात.

दुसऱ्या वरती छाप कशी पाडावी हे गुरुवारी जन्म झालेल्या लोकंकडून शिकावं. ज्या ठिकाणी जातात स्वतःचा ठसा उमटवतात त्यांच्या वागण्यातून यांच्या बोलण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआपच प्रभावित होतात. समोरच्या व्यक्तीवर प्रचंड इम्प्रेशन टाकण्याची ताकद या गुरुवारी जन्म झालेल्या व्यक्तींमध्ये असते.

6.शुक्रवार -ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो त्या व्यक्ती बुद्धिमान असतात आणि त्यांचा स्वभाव अतिशय छान असतो. सहनशील असतात. तुम्ही त्यांना किती हि पिडा द्या, त्रास द्या मात्र या व्यक्ती हा त्रास सहन करतात. तुमचे मन कधीच त्या दुखावणार नाहीत.

शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात. भावनेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान असतं. तुम्ही या लोकांची चेष्टा करा, मस्करी करा ते त्याला कधीच सिरीयसली घेणार नाही. अत्यंत जिंदादिल अशा प्रकारच्या व्यक्ती असतात. मात्र शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचा एक वैशिष्ट्य असं की, या व्यक्ती विचारांनी खूप स्थिर असतात.

आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चाललेला आहे हे समोरच्याला लवकर समजत नाही. आपल्या मनातील गोष्ट त्या कधीच सहजासहजी दुसऱ्याला सांगत नाही.

7.शनिवार-ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्यांच्यावर शनी महाराजांची कृपा असते. त्या व्यक्तीवर शनि ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो. या व्यक्ती स्वतःमध्येच मस्त राहतात. अगदी मनमोकळे पणे त्या जीवन जगतात. एखाद्याला त्यांनी वाचन दिल ते वचन त्या कधीच तोडत नाहीत.

प्राण जाये पर वचन न जाये, अशा प्रकारे ते वागतात आणि म्हणून दुसऱ्याची मन त्या सहज जिंकून घेतात. या व्यक्ती हसमुख असतात. सातत्याने हसत असतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामुळे वातावरणात निर्माण होतं. त्या ज्या ठिकाणी जातात तिथल्या होतात. कुठल्याही परीस्थितीत अगदी सहज मिसळतात आणि म्हणून लोक यांच्यावर ती अतिशय प्रेम करतात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *