मुली व महिला सक्षमीकरणासाठी सरकारने सुरु केल्या आहे या १० योजना, याद्वारे सरकार कोणत्या स्कीम किंवा योजनांमध्ये सूट देते जाणून घेऊया सविस्तर.

शिक्षण

सरकार कोणत्या स्कीम किंवा योजनांमध्ये ती सूट देते जाणून घेऊया सविस्तर. सरकारी योजना,जन धन, PMGKY, LPG, होम लोन:- केंद्र सरकार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात पैसे जमा करते. जन धन योजने अंतर्गत खात्या मध्ये ५०० रुपये पाठवते.

उज्वला योजनेतून निःशुल्क LPG कनेक्शन देण्यात येत आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की जन धन योजनेत रक्कम महिलांच्या खात्यावर जमा होते.परंतु आजही कित्येक गावातील , वस्तीतील महिलांना या योजनांची माहिती नाही. ज्यातून त्यांना फायदा होऊ शकतो.आम्ही तुम्हाला त्याच योजनांबद्दल माहिती देणार आहोत. बँक क्षेत्र :- कमी व्याजाच्या ऑफर, हे आहेत लाभ.

बँकिंग क्षेत्राने महिलांना चांगली सूट दिलेली आहे. जास्त करून बँका जवळ पुरुषांपेक्षा जास्त महिलांना जास्त सवलती दिल्या गेल्या आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांना 0.05% होम लोन व्याज कमी द्यावे लागते. यामागचे कारण असे की लोन देणाऱ्या संस्था महिलांना लोन देन अधिक सुरक्षित वाटत. ह्या योजनांमध्ये मिळते कमी व्याजावर लोन: महानगरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्रात महिलांचा चांगला सहभाग आहे.

३०% संपत्ती विकत घेणाऱ्या महिलाच आहे. महिलांसाठी खूप अश्या योजना समोर येत आहेत. ह्यामध्ये होम लोन चे विविध पर्याय खुले आहेत. लोन देणाऱ्या अनेक कंपनी प्रधानमंत्री आवास योजना, एच डी एफ सी वुमन पावर योजनेअंतर्गत कमी व्याजात महिलांना लोन देतात.

प्रधानमंत्री आवास योजना:ही योजना केंद्र सरकार द्वारे लोकांना स्वस्त घर मिळण्यासाठी सुरू केली गेली आहे. जी ३१ मार्च २०२२ पर्यंत चालेल. महिलांना या योजनेत खूप लाभ आहे. ह्यामध्ये विधवा,एकटी महिला, एससी एसटी वर्गातील महिला, दिव्यांग महिला किंवा बेरोजगार महिला यांना प्राधान्य देण्यात आले आहे. महिलांच्या नावावर घराचे रजिस्ट्रेशन केल्यास महिलांना सरकार कडून जवळजवळ दीड लाख रुपयांची सबसिडी मिळते.पण अट अशी आहे की ते घर पहिलच असावं.

जाणून घ्या ह्या योजनेच्या अटी: लाभार्थी महीलेच वय ७० च्या पुढे असू नये, EWS च वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावं, LIG च वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख असावं, MIG च वार्षिक उत्पन्न ६ लक्ष ते १८ लक्ष असावं, लाभार्थी महिलेकडे देशात इतर कुठेही अन्य संपत्ती नसावी, एच डी एफ सी बँक वुमन पावर स्कीम, एच डी एफ सी बँकेने गेल्यावर्षी या योजनेची घोषणा केली.या योजनेत बँक महिलांना ९.८५% व्याज दराने होम लोन देते. ही योजना त्या महिलांसाठी योग्य आहे ज्यांच्याकडे कमाईचा काहीं स्रोत आहे.

व्याज दरात 0.5% सूट: या योजनेत महिलांना 0.05% सूट दिली जाते. अस करून बँकिंग क्षेत्र महिलांना आत्मनिर्भर करण्यात आपली भूमिका बजावत आहे. महिलांसाठी सुरु आहे इतक्या होम लोन योजना: बँकिंग क्षेत्रातील अनेक संस्था होम लोन योजना देतात. ज्यात महिलांना विशेष सवलत आहेत. पुरुषांच्या तुलनेत जर महिला असेल तर व्याजात सूट मिळते.

ह्यात एस बी आई होम लोन, एच डी एफ सी होम लोन, आय सी आय सी आय होम लोन, अॅक्सिस होम लोन, डी एच एफ एल, बँक ऑफ बरोडा होम लोन, एल आय सी होम लोन, युको बँक होम लोन, विजया बँक होम लोन इत्यादी प्रमुख आहेत. स्टॅम्प ड्युटी मध्ये सूट: जर कोणत्या महिलेने संपत्ती खरेदी केली तर त्यांना स्टॅम्प ड्यूटी मध्ये १-२% सूट मिळते. महिलांना या बचतीचा फायदा मिळतो.

करा मध्ये सूट: ज्या महिला होम लोन घेतील त्यांना सरकारकडून कर देण्यात सुद्धा सूट मिळते. महिलांना मूळ रक्कम आणि व्याजावर लागणाऱ्या करात २ लक्ष पर्यंत सूट मिळते. स्वतःच्या नावावर महिलांनी होम लोन काढल्यास मिळतो हा लाभ: आपण पाहत असेल बँक आजकाल प्रत्येक केस मध्ये मध्ये जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्यात भर देते.

इथे मुख्य आवेदक महिला असली पाहिजे. कारण महिलांसोबत लोन मंजूर होण्याची टक्केवारी जास्त आहेत. आपल्याला लोन देण्यागोदर बँक आपली लोन देण्याची क्षमता वगेरे सर्व तपासून घेते. पण सोबत महिला असेल तर सूट व्याजात सूट मिळतें. ही सुविधा गृहिणी अथवा नोकरदार दोन्ही महिलांना मिळते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना:ही योजना पूर्णपणे महिलांसाठी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही योजना १ मे २०१६ रोजी सुरू केली. ह्यामध्ये महिलांना गॅस कनेक्शन पूर्णपणे निःशुल्क दिल गेलं आहे.

जर तुम्ही या योजनेचे पात्र आहात किंवा पात्र असलेल्या कोणाला ओळखत असाल तर जवळील गॅस केंद्रामध्ये पूर्ण माहिती मिळेल. सुकन्या समृध्दी योजना: या योजनेची सुरुवात केंद्र सरकार ने २०१४ मध्ये केली होती. या योजनेत जन्मापासून १० वर्षीय मुलीचे बँक खाते उघडले जाते. ह्यात नागरिक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडू शकते. ह्या साठी हजार रुपये जमा करावे लागतील. योजने च मुख्य काम मुलींच्या शिक्षणासाठी पैसे जमा करणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *