मुळशी पॅटर्न 2.0 : पुण्यात विठ्ठल शेलारची धिंड व्हिडीओ व्हायरल!!

Pune

5 जानेवारी रोजी कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे त्याच्या घराजवळ तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. छाती आणि खांद्यावर गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहोळचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून ते टीव्ही चॅनेल्सवर दाखविण्यात आले होते.

दरम्यान, शरद मोहोळ दिवसाढवळ्या हत्या प्रकरणामधील असलेल्या मास्टरमाईंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी धिंड काढली असून पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवत गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी जिथे लहानाचा मोठा झाला त्याच राहत्या घराच्या परिसरातून त्यांची धिंड काढली आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आला. तसेच पिंपरीत धिंड काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, कुख्यात शरद मोहोळ हत्येतील दुसरा मुख्य आरोपी असलेल्या विठ्ठल शेलारचे गाव हे मुठा गावापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेलं उरवडे गाव आहे. दरम्यान, मुळशी खोऱ्यातील या लहान गावांमध्ये वर्चस्व कोणाचं राहणार यातून निर्माण वादातून शरद मोहोळची हत्या झाल्याचं समोर आली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी एकेकाळी भाजपशीच संबंधित असलेल्या विठ्ठल शेलारला अटक करण्यात आले होते. तसेच मुळशी तालुक्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना जवळ केलं असल्याचे सांगितले जाते. मग हळूहळू त्यातूनच विठ्ठल शेलारला हत्या, हत्येचा प्रयत्न , खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले आणि 2017 साली त्याच्यावर मुळशी आणि भोर, वेल्हा या तालुक्यांची भारतीय जनता युवा मोर्चाची जबाबदारी सोपविण्यात आली।असल्याचे दिसून येते.

तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच 2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि तसेच त्याला अटकही झाली होती.

याशिवाय, 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. मग त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला होता. तसेच भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली आली होती. दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका देखील करण्यात आली होती.

मग त्यावर आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती, त्यामुळे आता आम्ही त्याच्यावर कारवाई करू, असे गिरीश बापट म्हणाले होते. ज्या ऐतिहासिक पुण्याला सांस्कृतिक शहर, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं त्याच पुण्यात गेल्या काही वर्षांपासून IT क्षेत्रातील भरभराटीने पैसा आल्यामुळे जे गुन्हेगारी निर्माण झाली ती आजही नियंत्रणात नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच पुण्यामध्ये खुलेआम सुरु असलेलं टोळीयुद्ध, कोयता गँग तसेच महिला अत्याचार आणि खुनामुळे प्रतिमा पार मलीन होत असल्याचे दिसून येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *