नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” भाग्याची साथ कोणाला नको असते सांगा बरं? आणि सगळ्यांना च ती हवी असते. आणि ते मिळवण्यासाठी लोक वाटेल ते उपाय करतात. पण वास्तूमध्ये भाग्याची साथ मिळवण्यासाठी अतिशय सोप्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
वास्तु शास्त्रामध्ये असं मानलं जातं की, जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता नसेल किंवा बुट आणि चपला विखुरलेले असतील तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश थांबतो आणि वास्तुदोष निर्माण होतो. परंतु मुख्य प्रवेशद्वारावर काही गोष्टी लावल्यास भाग्य साथ द्यायला सुरुवात होते. या गोष्टी कोणत्या आहेत? चला जाणून घेऊ या.
1. कलश – कलश हे संपन्नतेचे प्रतीक मानले जात. अध्यात्मिक दृष्टिकोनातून हे शुक्र आणि चंद्राचं प्रतीक आहे. आणि गणेशाच्या रुपात त्याची पूजा केली जाते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर रोज कलश भरून ठेवल्यास गणेशाच्या कृपेने शुभ लाभ मिळतो. मंडळी पण लोटी किंवा कल श जे काही ठेवाल त्याचे तोंड रुंद असावे.
रोज सकाळी आंघोळीरनंतर हा कलश पूर्ण भरून ठेवावा आणि तुम्ही त्यात गुलाबाच्या पाकळ्यांनी ही टाकू शकतात. असं केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल. हे पाणी रोज बदलत गेलं पाहिजे.
2. तोरण– कोणत्याही शुभकार्या पूर्वी किंवा कुठलाही सण आला कि आपण घराला तोरण लावतो, कारण तोरण दाराला लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि आपली सर्व कार्य अडथळ्या शिवाय पूर्ण होतात.
आंब्याची पाने उत्तम असून अशोकाच्या पानांनपासूनही तोरण बनवता येतं. वास्तूमध्ये असं म्हटलं जातं की सणां व्यतिरिक्त प्रत्येक मंगळवारी घरात तोरण लावल्यास त्याचे खूपच शुभ परिणाम प्राप्त होतात.
3.चीनी नाणी – फ्रेंच हुई मध्ये मुख्य दरवाजावर चिनी नाणी लावणे खूप शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि 3 चीनी नाणी एका लाल दोराीत बांधा आणि घराच्या आतील बाजूच्या मुख्य दरवाजाच्या हँडल वर ठेवा. असं केल्याने तुमच्या घरात पैसा जमा होण्याचे प्रमाण वाढते आणि लोकांच्या हातून होणारा अनावश्यक खर्च थांबतो.
4. स्वस्तिक – मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल आणि पिवळा किंवा निळा स्वस्तिक बनवा. तुम्हाला हवा असल्यास बाजारातून बनवलेल्या स्वस्तिक आणून सुद्धा तुम्ही मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लावू शकता.
मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तु आणि दिशा दोष दूर होतात. दुसरीकडे मुख्य दरवाजाच्या अगदी वर मध्यभागी निळ्या स्वस्तिक लावल्याने घरातील लोक वाईट नजरेपासून दूर राहतात.
5. घराच्या मुख्य प्रवेशद्वारा वर गणपतीचे चित्र – घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवण्यापूर्वी काही नियम जाणून घेणे गरजेचे आहे. असे म्हणतात की ज्या बाजूला गणेशाचा पोट असतं तिथे समृद्धी असते. ज्या बाजूला पाठ विसावते तेथे गरिबी असते.
म्हणून जेव्हा-जेव्हा मुख्य दरवाजावर गणेश जी ठेवाल, तेव्हा -तेव्हा त्यांना आतल्या बाजूला ठेवा. बाहेर लावल्याने तुमच्या घरावर विपरीत परिणाम होतो. घरात गरिबी वाढू लागते. ही दक्षता घेतल्यास भाग्याची योग्य ती साथ मिळेल अशी मान्यता आहे.
या सर्व गोष्टी गोष्टी लक्षात घेऊन तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर कशाचे चित्र आहे ते बघून त्याच्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील ते जाणून घ्या. आणि जिथे आवश्यक तसे बदल करून घ्या. या गोष्टींचा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद नांदेल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.